जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:25+5:302021-05-21T04:24:25+5:30
जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच मृत्यूंची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची तिसरी ...
जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच मृत्यूंची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून लहान मुलांमध्ये कोरोना पसरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
---
रस्त्याची डागडुजी करा
शिरोळ : शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील असणाºया हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर चर खोदण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी फक्त मुरूम टाकून ती चर बुजविण्यात आली होती. दरम्यान, यामुळे त्या ठिकाणी खोलगट भाग निर्माण झाल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांना अडथळे ठरत आहेत. अपघाताची शक्यतादेखील आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
हेरवाडमध्ये लोकवर्गणीतून ऑक्सिजन मशीन
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन लोकवर्गणीतून उपकेंद्रास ऑक्सिजन मशीन देण्यात आले. गावामध्ये आतापर्यंत आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, गाव कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहे. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी केलेल्या आवाहनानुसार गावामध्ये कोविड सेंटर उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.