जयसिंगपूर : संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:53+5:302021-07-16T04:17:53+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात आज, शुक्रवारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांकरिता मध्यान्ह भोजन ...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात आज, शुक्रवारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांकरिता मध्यान्ह भोजन योजनेस प्रारंभ करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, राजेंद्र देसाई, साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे, दिलीप पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि मर्चंटस असोसिएशनच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
--
पावसामुळे नद्या पात्राबाहेर
शिरोळ : तालुक्यात कृष्णेसह, वारणा, दूधगंगा व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. संततधार कोसळणाऱ्यापावसामुळे नद्या पात्राबाहेर पडत आहेत. त्यामुळे नदीकाठची गवती कुरणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. नदीकाठच्या विद्युत मोटरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
-
-
मातीचा ढीग हटवा
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील डेबॉन्स परिसरातील मार्गावर मातीचा ढीग गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आहे. तो वाहतुकीस अडथळा करीत आहे. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तरी हा ढीग काढून टाकण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.