‘जलयुक्त’साठी कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावे निश्चित

By admin | Published: April 12, 2017 04:29 PM2017-04-12T16:29:24+5:302017-04-12T16:33:08+5:30

बैठकीत शिक्कामोर्तब : जादा गावे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांतदादा पाटील

For the 'Jalakshi', 18 villages of Kolhapur district are certain | ‘जलयुक्त’साठी कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावे निश्चित

‘जलयुक्त’साठी कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावे निश्चित

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १२ : जलयुक्त शिवार योजनेसाठी २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील १८ गावांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत या गावांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यामध्ये आणखी जादा ३८ गावे वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजयसिंह देशमुख, वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले आदींची होती.

पाणलोट एकात्मिक योजनेतून ५० टक्के काम झालेली गावे व आमदारांनी सुचविलेल्या गावांचा समन्वय ठेवून २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी १८ गावांची निवड करण्यात आली आहे. यंदा ५६ गावे या योजनेसाठी घ्यावीत कारण यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो असे सुचविण्यात आल्याने. निवडण्यात आलेल्या १८ गावांसह आणखी ३८ गावे वाढवून २० कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी आणता येऊ शकतो. त्यामुळे यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करु असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये काही तक्रारी आहेत. परंतु त्या गंभीर स्वरुपाच्या नाहीत. तसेच २०१६-१७पर्यंत झालेल्या या योजनेतील कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आली आहेत. तमदलगे (ता. हातकणंगले) येथील कामाबाबत तक्रारी होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये तथ्थ आढळले आहे. त्याप्रमाणे शासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले.

निवडलेली १८ गावे

करवीर-खाटांगळे, सादळे मादळे
गगनबवडा-वेसरफ
भुदरगड-कोंडोशी, लोटेवाडी
आजरा-आर्दाळ
हातकणंगले-अंबपवाडी
शिरोळ-कोंडीग्रे
पन्हाळा-पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणे
शाहुवाडी-आकुर्ले
राधानगरी-पडळी, रामणवाडी
कागल-मांगनूर
गडहिंग्लज-तेगीनहाळ, कवळीकट्टी
चंदगड-गुडवळे खालसा, मजरे कारवे

Web Title: For the 'Jalakshi', 18 villages of Kolhapur district are certain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.