इचलकरंजीतील जलपर्णी हटविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:39+5:302021-02-26T04:34:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीला जलपर्णीने पूर्णपणे व्यापले होते. याबाबत पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक ...

Jalparni in Ichalkaranji begins to be removed | इचलकरंजीतील जलपर्णी हटविण्यास सुरुवात

इचलकरंजीतील जलपर्णी हटविण्यास सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीला जलपर्णीने पूर्णपणे व्यापले होते. याबाबत पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक टीम व पालिकेच्यावतीने जलपर्णी हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहत आल्याने नदीघाटात जलपर्णीने विळखा घातला. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन त्याचा धोका जलचरांना होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत दरवर्षीप्रमाणे यंदा पुन्हा जलपर्णी काढण्याची मोहीम भोसले यांची व्यंकोबा मैदान येथील पैलवानांची एक टीम जलपर्णी काढण्यात गुंतली होती. या मोहिमेत सकाळच्या सत्रात १५ डंपर जलपर्णी काढण्यात आली.

फोटो ओळी

२५०२२०२१-आयसीएच-०२

पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली होती. त्यामुळे नदीपात्राला क्रीडांगणाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

२५०२२०१-आयसीएच-०३

व्यंकोबा मैदानमधील पैलवान, वरदविनायक बोल्ट क्लब व पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी अमृत भोसले, डॉ. विजय माळी, शुभम कोरे, शुभम धुमाळ, संदेश आजगेकर यांच्यासह पैलवान व पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Jalparni in Ichalkaranji begins to be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.