राज्याच्या धोरणनिश्चितीत ‘जनसुराज्य’चा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 07:20 PM2016-10-27T19:20:28+5:302016-10-27T19:22:12+5:30

विनय कोरे : फडणवीस यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा

Janasurajya's participation in the state's policy-making | राज्याच्या धोरणनिश्चितीत ‘जनसुराज्य’चा सहभाग

राज्याच्या धोरणनिश्चितीत ‘जनसुराज्य’चा सहभाग

Next

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कारभाराच्या धोरण निश्चितीमध्ये आता यापुढे आमचा सहभाग राहील. ‘एक विश्वासू घटक पक्ष’ म्हणून आम्ही महाराष्ट्रातील सरकारसोबत राहू, अशी माहिती ‘जनसुराज्य शक्ती’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर कोरे यांच्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
कोरे म्हणाले, राज्यातील महायुतीचा एक घटकपक्ष म्हणून आम्ही आजपासून सहभागी झालो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना आमच्याकडे आहेत. नवनवीन संकल्पना आहेत. त्याची मांडणी केली जाईल. त्यावर चर्चा होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली .
घटकपक्ष म्हणून काम करत असताना सरकारचे कामकाज कसे चालले आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, त्यांच्यासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी चालली आहे, त्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत का याची महिन्या-दीड महिन्यांतून एकत्र बसून सर्वच घटकपक्षांची बैठक होण्याची गरज आहे. त्यालाही फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

Web Title: Janasurajya's participation in the state's policy-making

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.