जनता बझारसाठी एकतर्फीच लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 05:40 PM2017-07-30T17:40:06+5:302017-07-30T17:53:34+5:30
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्यूमर्स स्टोअर्स (जनता बझार)ची निवडणूकीत विरोधी आघाडीत अद्याप सामसूम असल्याने निवडणूक एकतर्फीच होण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. ६) मतदान होत असल्याने उर्वरित कालावधीत पॅनेल बांधून आव्हान निर्माण करणे अवघड आहे. त्यामुळेच विरोधी पॅनेलची शक्यता धूसर आहे.

उमेदवारी अर्ज अपात्रता, त्यानंतर दाखल झालेली याचिका व जिल्हा उपनिबंधकांनी तब्बल ५६ जणांना पात्र ठरविल्याने जनता बझारची निवडणूकीत चांगलीच गाजली. त्यापेक्षाही पॅनेल बांधणी करताना आणि माघारी नंतरही राजकीय घडामोडीने निवडणूक चर्चेत राहिली आहे.
‘रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडी’च्या उमेदवारांची झालेली घोषणा त्यानंतर पॅनेलमध्ये केलेला बदल व त्यावर उठलेले वादळ अद्याप शांत झालेले नाही. ‘कुंभार विकास आघाडी’चे प्रमुख प्रल्हाद चव्हाण यांचे चिरंजीव सचिन चव्हाण यांनीच बंड केल्याने आघाडी समोर पेच निर्माण झाला आहे. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असे जरी म्हटले तरी दुसरे पॅनेल करण्याची शक्यता फारच धूसर आहे.
बझारसाठी रविवारी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचारासाठी जेमतेम पाच दिवस राहिल्याने आता पॅनेल बांधून आव्हान निर्माण करणे शक्य नाही. त्यात माजी संचालकांकडे एक गठ्ठा मते आहेत. पै-पाहुण्यांसह मित्र परिवार मतदार असल्याने माजी संचालकांची भूमिका महत्वाचे ठरणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत ताणा ताणा होऊनही ते एकत्र राहिले. त्यामुळे विरोधी पॅनेल करून आव्हान निर्माण करणे तितकेसे सोपे नाही.