जरांगे पाटील, भुजबळांनी ताणवू नये; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
By समीर देशपांडे | Published: December 22, 2023 03:55 PM2023-12-22T15:55:28+5:302023-12-22T15:56:03+5:30
कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील ५४ लाख कुटुंबाना फायदा होणारे कुणबी दाखले मिळाले आहेत ही वस्तुस्थिती ...
कोल्हापूर: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील ५४ लाख कुटुंबाना फायदा होणारे कुणबी दाखले मिळाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असे छगन भुजबळ म्हणत आहेत. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे या दोघांनीही फार ताणवू नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, सरसकट आरक्षण, साेयरे यांना आरक्षण याबाबत ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत. त्या जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना सांगितल्या जात आहे. त्यांच्याशी चर्चा करणे शासन सोडणार नाही. परंतू शासनाची याबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन बांधिल आहे.