जयसिंगपुरात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

By admin | Published: July 22, 2016 09:37 PM2016-07-22T21:37:41+5:302016-07-23T00:05:49+5:30

नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग : ‘बाहेरून शह अन् आतून तह’वरच लक्ष; आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरणार

Jashingpur bashing of the knee! | जयसिंगपुरात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

जयसिंगपुरात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

Next

जयसिंगपूर : आगामी पालिका निवडणुकीसाठी जयसिंगपुरात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या २४ जागांसाठी निवडणूक होणार असून, आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या ‘निवडणुकीचे रणशिंग अन् गुडघ्याला बाशिंग’ बांधणारे बाहेरून शह आतून तह करणार काय? याबरोबरच दोन्ही काँग्रेसची आघाडी व स्वाभिमानी, भाजप, महाडिक गट, शिवसेना समोरासमोर उभे ठाकणार का? या चर्चेने मात्र सध्या जयसिंगपूर शहरात राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे.
सन २०११च्या जनगणनेनुसार जयसिंगपूर शहराची लोकसंख्या ४८ हजारांच्या आसपास आहे. चार हजार लोकसंख्या गृहीत धरून १२ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभागनिहाय आरक्षणदेखील निश्चित झाले आहे. सध्या पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजप व शिवसेना पक्ष सत्तेत असल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभागरचना आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड हा पॅटर्न नगरपालिका निवडणुकीत राबविला जाणार आहे. विधान परिषदेनंतर जिल्ह्यात महाडिक पॅटर्न नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ‘एंट्री’ करणार आहे. एकहाती सत्तेमुळे सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी महाडिक गट भाजपबरोबर आघाडी बांधण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरच ही आघाडी मूर्त स्वरूप घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
आरक्षणानंतर आजी-माजी नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आघाडीकडे सध्या इच्छुकांची संख्या मोठी दिसून येत आहे. यामुळे नेत्यांसमोर निवडणुकीवेळी पेच निर्माण होणार आहे. एकूणच आरक्षणानंतर
आजी-माजी नगरसेवकांनी सुरू केलेली मोर्चेबांधणी आणि
आघाड्या कशा असणार? याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)


आघाड्यांकडे लक्ष
नुकत्याच झालेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनी मोट बांधून भाजपला सत्तेपासून रोखले.


बाजार समितीच्या निवडणुकीत हे प्रमुख पक्ष एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चित्र वेगळे असणार आहे.


शह, काटशहच्या राजकारणात कोण बाजी मारणार? याकडे जयसिंगपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Jashingpur bashing of the knee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.