जयसिंगपूरात शोडषकारण व दशलक्षण रथोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 08:56 PM2017-09-07T20:56:57+5:302017-09-07T20:57:03+5:30

जयसिंगपूर : येथील शाहूनगरमधील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टतर्फे मौजे संभाजीपूरमध्ये शोडषकारण व दशलक्षण मंगल सोहळा सुरू आहे.

  Jasingpur full moon preparation and summer preparations | जयसिंगपूरात शोडषकारण व दशलक्षण रथोत्सवाची तयारी पूर्ण

जयसिंगपूरात शोडषकारण व दशलक्षण रथोत्सवाची तयारी पूर्ण

Next

जयसिंगपूर : येथील शाहूनगरमधील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टतर्फे मौजे संभाजीपूरमध्ये शोडषकारण व दशलक्षण मंगल सोहळा सुरू आहे. सोहळ्या निमित्त शनिवारी ९ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाºया रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

या रथोत्सव मिरवणूकीमध्ये ११ बँड, ११ झांजपथक, १०८ घोडे, ५ हत्ती, ११ बगी, ११ रथ व एक एलईडी स्क्रीन यांचा समावेश आहे. मिरवणूकीवर, फिरत्या २३ फूटी भव्य समवशरण व जैन मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पहिल्या तीन पुष्पवृष्टीसाठी सवाल करण्याकरीता नांवे नोंद करण्यात येणार आहेत् त्याप्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे असे ट्रस्टच्यावतीने जाहीण्यात आले आहे.

 मंदिराच्या बहुउद्देशीय कायार्ला एक एकर जमिन दान

श्री. १००८ अदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टला येथील थोर दानशूर व्यक्तीमत्व असणारे डॉ. श्रीकांत मोटके पाटील यांनी आपली सांगली-कोल्हापूर महामार्गालगत असणारी १ एकर जमीन मंदिर ट्रस्टला शैक्षणिकसह इतर बहुउद्देशीय कायार्साठी दान केली आहे. त्यानिमित्त दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने डॉ. मोटके पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
 

 

Web Title:   Jasingpur full moon preparation and summer preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.