जयस्विन, इक्बालची आगेकूच

By Admin | Published: December 15, 2015 12:20 AM2015-12-15T00:20:44+5:302015-12-15T00:20:44+5:30

अंडर-१४ टेनिस स्पर्धा : अखिल भारतीय सुपर सीरिजला कोल्हापुरात प्रारंभ

Jaswin, Iqbal front | जयस्विन, इक्बालची आगेकूच

जयस्विन, इक्बालची आगेकूच

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे मेरी वेदर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या योनेक्स सनराईज अखिल भारतीय टेनिस सुपर सीरिज स्पर्धेत सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात प्रथम मानांकित पंजाबच्या जयस्विन सिदानाने १२ व्या मानांकित मुंबईच्या लेस्टन वाझवर, तर मुलांमध्ये तेलंगणच्या तेराव्या मानांकित इक्बाल खानने तमिळनाडूच्या अरोन पॉलवर मात करीत आगेकूच केली. स्पर्धेचे उद्घाटन ‘आयकर’चे सहायक संचालक रवी मेहरेजा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभाकर दळवी, डॉ. दिनेश कित्तुरे, दिलीप ताटे, सचिन कदम, प्रभाकर पाटील, सरदार मोमीन, अशोक मुराई उपस्थित होते.

दिवसभरातील निकाल असा :
मुले : गिरीश चौगले (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध शशांक नरदे (कर्नाटक), हर्ष कुमार (तमिळनाडू) वि. वि. अथर्व पाटील (महाराष्ट्र), शंतनू पवार (महाराष्ट्र) वि. वि. प्रसाद इराळे (महाराष्ट्र), विशाल रेडी (कर्नाटक) वि. वि. आकर्ष गांवकर (कर्नाटक), श्रीजित सेन (महाराष्ट्र) वि. वि. अन्मय देवराज (कर्नाटक), नवदीश बंजानी (महाराष्ट्र) वि. वि. इंद्रजित बोराडे (महाराष्ट्र), खान मोहमद वि. वि. हृदय सोनावले (दोघे कर्नाटक), भुवन अंबेकलू (कर्नाटक) वि. वि. अमितेश सक्सेना (तमिळनाडू), जयवर्धन पाटील (महाराष्ट्र) वि. वि. सुंदर सेल्वम (तमिळनाडू), वर्धन कारकल (महाराष्ट्र) वि. वि अर्जुन कुंडू (गुजरात), आदित्य रॉय चौधरी (पं. बंगाल) वि. वि. ऋषिकेश वैद्य (कर्नाटक).

मुलीत : संस्कृती गुप्ता (कर्नाटक) वि. वि. शशिका अगरवाल (तमिळनाडू), बेला ताम्हणकर (महाराष्ट्र) वि. वि. स्मृती भसीन (आंध्र प्रदेश), गार्गी हवालदार वि. वि. बेला पंढरपुरे (दोघे महाराष्ट्र), पावनी पाठक वि. वि. सानिका कांबळी (दोघी महाराष्ट्र), अनन्या कोथाकोटा (आंध्र प्रदेश) वि. वि. कुशी संतोष (आंध्र प्रदेश), संजना सिरिमला (तेलंगणा) वि. वि. जिया लोढा (पुणे), दुर्वा देव (महाराष्ट्र) वि. वि. वैभवी सक्सेना (कर्नाटक).

Web Title: Jaswin, Iqbal front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.