पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 06:16 PM2020-11-10T18:16:30+5:302020-11-10T18:18:06+5:30
pune, teacher, elecation, kolhapurnews पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगळवारी प्रा. जयंत दिनकरराव आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगळवारी प्रा. जयंत दिनकरराव आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
पुणे शिक्षक मतदार संघात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून, १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून श्रीराम ज्यूनिअर कॉलेजचे प्रा. जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकतात्या पाटील, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड, व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील, रंगराव तोरस्कर, जयसिंग पोवार, शिवाजी चौगले, दत्तात्रय जाधव, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, बी. आर. नाळे, सदाशिव खाडे, आनंदा कासोटे, डी. जी. खाडे, के. के. पाटील, उदय पाटील, प्रा. समीर घोरपडे, संदीप पाटील, विनोद उत्तेकर, बी. के. मोरे, पी. जी. वरेकर यांच्यासह सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.