जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित, दुसऱ्या टप्प्यातील सफाई मोहीम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:27 AM2019-05-13T11:27:55+5:302019-05-13T11:30:07+5:30

कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम ...

  Jayanti Balaal Water flowed, second phase cleanliness campaign successful | जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित, दुसऱ्या टप्प्यातील सफाई मोहीम यशस्वी

जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित, दुसऱ्या टप्प्यातील सफाई मोहीम यशस्वी

Next
ठळक मुद्दे जयंती नाल्याचे पाणी झाले प्रवाहित, दुसऱ्या टप्प्यातील सफाई मोहीम यशस्वीमहिलांनी दिला ‘स्वच्छ, सुंदर कोल्हापूर’चा नारा; स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

कोल्हापूर : जयंती नाल्यातील जलस्रोत सुरू करून पूर्ववत नदीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महानगरपालिकेने रविवारी लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविली. मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवाशांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला.

दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेतून नाल्यातील सुमारे १४ डंपर कचरा काढून तो उठाव केला. बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ असा नारा देत जनजागृती रॅली काढली. ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते सिद्धार्थनगर या दरम्यान कोल्हापूर शहरातून जाणारा हा जयंती नाला स्वच्छ करून पाणी प्रवाहित केले.

महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियोजित केल्याप्रमाणे कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला लोकसहभागातून सफाईच्या मोहिमेला गेल्या रविवारी (दि. ५) प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर रविवारी दुसºया टप्प्यात नाला सफाईला प्रारंभ झाला.

उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, न्यायाधीश उपेशचंद्र मोरे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, फेरीवाला संघटनेचे दिलीप पोवार यांनी सक्रिय सहभाग नोदवला.

पंप हाऊस ते सिद्धार्थनगरपर्यंत, साईक्स एक्स्टेन्शनमधील जयप्रकाश नारायण उद्यान, यल्लमा मंदिरनजीक असे तीन ग्रुप करून ही स्वच्छता मोहीम राबविली. शहर पाणीपुरवठा व ड्रेनेज, बोअरिंग, बाग विभाग, आरोग्य विभाग, एन.यु.एल.एम., महिला बचत गट, स्थानिक नागरिक सहभागी झाले.

सर्वांनी जयंती तसेच इतर नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, नागरिकांनी कचरा कोंडाळ्यातच किंवा घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी आपल्या घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्ररीत्या गोळा करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा, असे महापालिकेच्या वतीने आवाहन यावेळी करण्यात आले.


पावसाळ्यात थर्मोकॉल व प्लास्टिक नाल्यामध्ये साचून नाला तुंबतो. त्यामुळे थर्मोकॉल व प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, लोकांमध्ये प्रबोधन करावे, दंडात्मक कारवाई करावी. संपूर्ण नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडचा वापर करून काढण्यात येणार असून, नाला पात्र रुंदीकरण करण्यात येणार आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
आयुक्त, कोमनपा.


बचत गटांच्या रॅलीने उपक्रमाची सांगता

उपक्रमाची सांगता आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांनी ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’अशा घोषणा देत रॅलीद्वारे केली. यावेळी महिलांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. या बचत गटांमध्ये वारणानगर वारणा प्रेरणा सी.एम.आर. के. गट, माळीम महिला विकास बचत गट, आसावरी महिला बचत गट, जिद्द वस्तीस्तर संस्था, प्रगती वस्तीस्तर संस्था, शाहूपुरी येथील स्वरा फौंडेशन यांचा सहभाग होता.

स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

या नाला सफाई मोहिमेला लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यामध्ये फेरीवाला संघटना, क्रिडाई कोल्हापूर, आर्किटेक्ट असोसिएशन, हॉटेल मालक संघ, राजाराम गायकवाड विचारमंच यांच्यासह अनेक महिला बचत गटांचा सहभाग होता. महापालिकेच्या आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशमन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, वर्कशॉपमधील सुमारे १००० अधिकारी, कर्मचारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते, नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

यंत्रणा
कर्मचारी, स्वयंसेवक : सुमारे १५००
डंपर संख्या : ८
जेसीबी संख्या : ४
कचरा उठाव : १४ डंपर

 

 

Web Title:   Jayanti Balaal Water flowed, second phase cleanliness campaign successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.