शहरात स्वच्छतेची ‘जयंती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:32 AM2019-05-06T00:32:30+5:302019-05-06T00:32:35+5:30
कोल्हापूर : जयंती नाल्याचे प्रदूषण दूर करून तिला पूर्ववत नदीचे रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून रविवारी ...
कोल्हापूर : जयंती नाल्याचे प्रदूषण दूर करून तिला पूर्ववत नदीचे रूप प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न महापालिकेने लोकसहभागातून रविवारी सकाळी केला. महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा २५०० जणांनी श्रमदान करण्यासाठी ‘स्वच्छ-सुंदर-निरोगी कोल्हापूर’ या मोहिमेत सहभाग घेतला.
रामानंदनगरपासून खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतच्या जयंती नाल्यातील तसेच सिद्धार्थनगर नाल्यातील व काठांवरील कचरा, प्लास्टिक, खुरट्या वनस्पती काढून पाणी प्रवाहित केले. त्यामुळे नाल्याने रविवारी मोकळा श्वास घेतला. जयंती नदीच्या इतिहासात अशा पद्धतीने व्यापक मोहीम प्रथमच राबविली. तिला कोल्हापूरकरांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळाला.
विविध संघटनांचा सहभाग : महापालिकेचे सर्व विभाग, शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी कॉलेज, व्हाईट आर्मी, पाचगावचा शिवबा मराठा मावळा गु्रप, फेरीवाला संघटना, निसर्गमित्र संघटना, वृक्षप्रेमी ग्रुप, आदी संघटनांचा यात सहभाग होता.
नियंत्रित पाच पथके : हॉकी स्टेडियम ते सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुग्णालय ते लक्ष्मीपुरी, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या पद्धतीने पाच विभागात पाच नियंत्रण पथके तयार करून मोहीम.