जयसिंगपूर, कुरुंदवाड महावितरणला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:51+5:302021-02-06T04:44:51+5:30

जयसिंगपूर / कुरुंदवाड : जयसिंगपूर व कुरुंदवाड भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा ...

Jaysingpur, Kurundwad avoid hitting MSEDCL | जयसिंगपूर, कुरुंदवाड महावितरणला ठोकले टाळे

जयसिंगपूर, कुरुंदवाड महावितरणला ठोकले टाळे

googlenewsNext

जयसिंगपूर / कुरुंदवाड : जयसिंगपूर व कुरुंदवाड भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

जयसिंगपूर येथे मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर यांच्या नेतृत्वाखाली एस. टी. स्टॅण्डजवळील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. मागण्यांबाबतचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. मिलिंद भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता कडाळे, सोलगे, पेटकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी राजेंद्र दाईंगडे, संतोष जाधव, पंकज गुरव, सुनील ताडे, वसंत पवार, विनायक अण्णेगिरीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कुरुंदवाड येथे घरगुती वीज बिल व वीज ग्राहकांना दिलेली नोटीस रद्द करावी, या मागणीसाठी महावितरण कार्यालयास टाळे ठोकून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व जि. प. सदस्य दलितमित्र अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, नगरसेवक उदय डांगे यांनी केले. आंदोलनात सुरगोंडा पाटील, अनुप मधाळे, दयानंद मालवेकर, सीताराम भोसले, आजम गोलंदाज, राजेंद्र फल्ले, रणजित डांगे, सुदर्शन माळी, स्वप्निल श्रीधनकर, अनिल शिकलगार सहभागी झाले होते.

फोटो - ०५०२२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर मार्चा काढून निवेदन देण्यात आले.

Web Title: Jaysingpur, Kurundwad avoid hitting MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.