जयसिंगपुरात दारुबंदी समिती कागदावरच!--दारुबंदीचा प्रस्ताव होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:48 PM2017-10-09T23:48:03+5:302017-10-09T23:49:15+5:30

जयसिंगपूर : शहरातील दारुबंदीसाठी समिती कागदावरच राहिली आहे.

Jaysingpur, the liquor baron committee will be on paper! - Will the proposal be lifted? | जयसिंगपुरात दारुबंदी समिती कागदावरच!--दारुबंदीचा प्रस्ताव होणार का?

जयसिंगपुरात दारुबंदी समिती कागदावरच!--दारुबंदीचा प्रस्ताव होणार का?

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांचे मतदान किंवा राज्य शासनाची मान्यता दारुबंदीसाठी आवश्यकसमिती स्थापन करून अहवाल सादर करणे हा नुसताच फार्स

संदीप बावचे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : शहरातील दारुबंदीसाठी समिती कागदावरच राहिली आहे. पालिका सभेत अनेक निर्णय होतात. मात्र सभा संपल्यानंतर त्याचा पाठपुरावा होत नाही, असा उहापोह नुकत्याच झालेल्या सभेत खुद्द नगरसेवकांनीच केला आहे. त्यामुळे शहर दारुबंदीवरुन शाहू आणि ताराराणी आघाडीने घेतलेला निर्णयही असाच ठरला आहे.
दारुबंदीसाठी समिती स्थापन करून अहवाल सादर करणे हा नुसताच फार्स ठरला असून खरोखरच दारुबंदी करायची असेल तर प्रत्येक प्रभागात महिलांचे मतदान घ्यावे लागेल, किंवा राज्य शासनाला प्रस्ताव सादर करुन त्याला मंजूरी घ्यावी लागेल. तरच दारुबंदी यशस्वी होणार आहे.
सर्वाेच्च न्यायालयाने राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरुध्द मद्यविक्रेत्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने काही दिवसांनी नगरपालिका व महापालिकेमधून रस्ते वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर या रस्त्यावरची मद्यविक्री पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, ३१ आॅगस्ट २०१७ रोजी झालेल्या पालिकेच्या सभेत शहरात दारुबंदीच्या ठरावावरुन शाहू व ताराराणी या दोन्ही आघाडीच्या सदस्यांची अस्पष्ट भूमिका दिसली होती. दारुबंदीबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही आघाडीतील सदस्यांची समिती नियुक्ती करण्याचा निर्णय झाला होता. या समितीकडून अहवाल आल्यानंतर शहरातील संपूर्ण दारुबंदीचा निर्णय होईल, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका सभेत दारुबंदीबाबत ठोस निर्णय झाला नव्हता.
दरम्यान, दारुबंदीबाबत समिती ठरावापूर्तीच मंजूर होवून ती कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या हद्दीमध्ये दारुबंदी करायची असेल तर सर्व प्रभागामधील महिलांचे मतदान घ्यावे लागेल. दारुबंदीसाठी मतदानाचा एक टक्क्याचे जरी बहुमत असलेतरी हा निर्णय अंमलात आणला जावू शकतो. त्यासाठी पालिकेच्या सर्वच्या सर्व बारा प्रभागामध्ये मतदानाची प्रक्रिया राबवावी लागेल. राज्य शासनाला पालिकेने प्रस्ताव सादर केल्यास आणि त्याला राज्य शासनाने मंजूरी दिल्यास दारुबंदी होणे शक्य आहे. जर खरोखरच समिती स्थापन झाली असेल त्याचा अहवाल जनतेपुढे सादर करुन दारुबंदीबाबत नगरसेवकांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. केवळ शहर दारुमुक्त करण्याच्या गप्पा पालिकेच्या सभेतून चालणार नाहीत. त्यासाठी जनजागृतीच्या चळवळीतून काम करण्याची गरज आहे.


तरच दारुबंदी यशस्वीदारुबंदीसाठी समिती स्थापन करणे, या ठरावाला नगरसेवकांनी दिलेली मंजुरी हा केवळ मुलामा देण्याचा प्रयत्न असून, दारुबंदीसाठी व्यापक चळवळ उभी करणे आवश्यक आहे. दारुबंदी करायची असल्यास महिलांचे मतदान घेणे किंवा शासनाने यासंदर्भात निर्णय घेणे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत लोकप्रतिनिधींना घ्यावी लागेल. समिती स्थापन होवून सभेमध्ये दारुबंदीचा ठराव जरी झाला, तरी तो यशस्वी होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची गरज आहे

दारुबंदीसाठी शाहू आघाडीने मागणी केली होती. त्यानुसार पालिका सभेत दारुबंदीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. समितीत ताराराणी आघाडीतील सदस्यांची नावे दिली आहेत. मात्र, शाहू आघाडीकडील सदस्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. याबाबत लवकरच निर्णय होईल.
- डॉ. नीता माने, नगराध्यक्ष

Web Title: Jaysingpur, the liquor baron committee will be on paper! - Will the proposal be lifted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.