जयसिंगपूरचे सव्वा कोटी दरवर्षी ‘कचऱ्यात’

By admin | Published: May 17, 2017 01:09 AM2017-05-17T01:09:26+5:302017-05-17T01:09:26+5:30

कचऱ्याची समस्याकायमच : नव्या सभागृहाचे साडेचार महिने कचरा प्रश्नातच गेले, जागा नाही

Jaysingpur's 'Savarkar' | जयसिंगपूरचे सव्वा कोटी दरवर्षी ‘कचऱ्यात’

जयसिंगपूरचे सव्वा कोटी दरवर्षी ‘कचऱ्यात’

Next

संदीप बावचे ।  लोकमत न्यूज नेटवर्क  जयसिंगपूर : शहरात चांगली, दर्जेदार साफसफाई व्हावी, यादृष्टीने जरवर्षी प्रशासन घनकचरा विभागावर सव्वाकोटी रुपये खर्च करते. त्यातूनही अनेकवेळा शहर स्वच्छतेबाबत तक्रारी येतात. पालिकेच्या नव्या सभागृहाला नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कचऱ्याचा प्रश्नाला सामोरे जावे लागले. गेल्या साडेचार महिन्यापासून कचरा टाकण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे.
जयसिंगपूर शहरातील कचऱ्याचा जागेचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. शाहू आघाडीच्या प्रयत्नामुळे खामकर मळ्यातील बाळासाहेब देसाई यांच्या शेतात सध्या कचरा टाकला जात असला तरी दोन महिने कचरा टाकण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. येणाऱ्या काळात एकतर चिपरी हद्दीतील खणीत पूर्वीप्रमाणे कचरा टाकला जावा अथवा नवीन जागा पालिकेला घ्यावीच लागणार आहे.
शहरातील सुमारे १६ टन कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर चिपरी गावच्या हद्दीत दोन एकर जागा पालिकेला मिळाली होती. दरम्यान, जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घणकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत आहेत. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने १ जानेवारी २०१७ चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध करीत कचरा डेपोसमोर चरखुदाई करुन रस्ता बंद केला. यामुळे गेल्या साडेचार महिन्यापासून शहरातील संकलित केलेल कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न आवासून उभा आहे. तात्पुरती पर्यायी जागा उपलब्ध झाली असलतरी येणाऱ्या काळात कचऱ्याचा प्रश्न उभा राहणार आहे.


लोकसहभागाचा अभाव
कोणतीही चळवळ लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. नगरपालिकेने अनेकदा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात लोकसहभाग दिसला नाही. ओला व सुका कचरा वेगळा करावा. कचरा उघड्यावर कुठेही फेकू नये. कचरा घंटागाडीतच टाकावा. याबाबत जनजागृती मोहीम राबवूनही काही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
सफाई अभियानाचा देखावा
नगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवानिमित्त १ एप्रिलपासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. वर्षभर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला होता. या अभियानातून काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात कचराकोंडाळे ओसंडून वाहत होत्या. इतरत्र कचरा पडला होता. मात्र, या प्रश्नाकडे चार दिवसात कोणीही मागे वळून पाहिले नाही.
भाजीमंडई दुर्गंधीत
अग्निशामक दलाचे विभागाशेजारीच भाजीमंडई आहे. अग्निशामक विभागाच्या पाठीमागील बाजूस कचरा गाड्या उभ्या केल्या जातात. या परिसरात खराब झालेल्या कचराकुंड्या टाकल्या आहेत. त्याठिकाणी पडलेला कचऱ्यामुळे भाजी मंडई दुर्गंधीच्या चक्रात सापडली आहे.
घनकचऱ्याचे बजेट
घनकचरा एकत्रिकरणासाठी पालिकेचे १ कोटी ३० लाख रुपयांचे बजेट आहे. दिवसाकाठी हिशेब झाल्या किमान २८ हजार रुपये इतका खर्च घनकचरा एकत्रिकरणासाठी करावा लागतो. सात घंटागाड्या, १४० कचराकुंड्या, दोन वाहन, ७५ हून अधिक सफाई कामगारांची संख्या आहे.

Web Title: Jaysingpur's 'Savarkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.