मोरेवाडीतील गावठी हातभट्ट्या जेसीबीने उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:33 PM2019-10-15T15:33:54+5:302019-10-15T15:34:04+5:30
अवैध गावठी हातभट्ट्यांवर आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क आणि राजारामपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीमध्ये असणाऱ्या अवैध गावठी हातभट्ट्यांवर आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क आणि राजारामपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने हातभट्ट्या उद्ध्वस्त करून 1 लाख 7 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आज सकाळी 8 वाजल्यापासून ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमध्ये 5 हजार 850 लिटर रसायन, 175 लिटर तयार हातभट्टी दारू, 26 लोखंडी पिंप, 12 लोखंडी डब्बे व इतर साहित्य मिळून 1 लाख 7 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक बापूसो चौगुले, राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश मते, संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक माधव चव्हाण, अविनाश घाटगे, अभिनंदन कांबळे, किशोर नडे, सुधीर भागवत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महादेव आगळे, रणजित येवलुजे, हरिष बोभाटे, जवान जयदीप ठमके, प्रदीप गुरव, सचिन काळेल, शंकर मोरे, महिला जवान हेमलता गायकवाड, सविता हजारे यांनी ही कारवाई केली.