जीव गेले आठ; तरी प्रशासन ताठ! मृत्यूचा ‘डेंजर झोन’

By admin | Published: November 18, 2014 09:06 PM2014-11-18T21:06:21+5:302014-11-18T23:38:18+5:30

खड्डे भरून घेण्यास प्रारंभ, मूळ कारण सोडून मलमपट्टीवर भर

Jeevan was eight; But the administration is stiff! Death's 'Danger Zone' | जीव गेले आठ; तरी प्रशासन ताठ! मृत्यूचा ‘डेंजर झोन’

जीव गेले आठ; तरी प्रशासन ताठ! मृत्यूचा ‘डेंजर झोन’

Next

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खंडाळा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर हायवे प्रशासनाने अपघातस्थळावरील खड्डे मुजवून त्यावर डांबरीकरण करून तात्पुरती मलमपट्टी केली आहे तर तुटलेल्या संरक्षक कठड्यांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावून दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघाताचे मूळ कारण व खराब रस्त्यांबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, अपघातस्थळावरील बसथांबा बंद करून महामार्गावरच पुढच्या ठिकाणी तो सुरूच असल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडत होती. या अपघातानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व रस्ता रुंदीकरणाचे ठेकेदार व स्थानिक नागरिक यांची बैठक घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर खंडाळा येथे अपघाताच्या ठिकाणी सेवा रस्त्यावरील खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले तर तुटलेले कठड्यांच्या जागी कापडी स्टिकर लावण्यात आले. मात्र, पुलावरील झाडे-झुडपे अद्याप तोडलेली नाहीत. खंडाळा उड्डाणपुलाखालील खड्ड्यांमध्ये अजूनही पाणी साठलेले असते तर अपघातानंतर बसचालकांना सूचना देऊन बसस्थानकाकडे वळविण्यात येणाऱ्या बसेस स्थानकात न जाता बाहेरूनच जातात. प्रवासी मात्र स्थानकात प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात काम न करता अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजेनुसार दुरुस्त्या व्हाव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) ‘एस’... येथेच घडतात अपघात! सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन भीषण अपघातात २० जणांचा जीव गेला. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशास्त्रीय वळणे काढण्याच्या सूचना केल्या मात्र परिस्थिती आजही बदललेली नाही. अपघात घडलेल्या ठिकाणी डांबरीकरण शिरवळ : पारगाव, ता. खंडाळा या ठिकाणी कंटेनर उलटून आठ प्रवासी ठार झाल्याच्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सला जाग आली असून कंटेनर हलवित अपघाताच्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कंटेनरखाली चिरडून आठ प्रवाशांचे जीव घेतले. या घटनेच्या नंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सच्या डोळ्यावरील पट्टी निघाली असून खंडाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघाताच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्सकडून खड्डे मुजवून डांबरीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Jeevan was eight; But the administration is stiff! Death's 'Danger Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.