बस प्रवासात महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:03+5:302021-03-18T04:24:03+5:30

पोलिसातून मिळालेली माहिती अशी कुंभार या सातारा येथून कोल्हापूरला नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. हा विवाह श्री लाॅन,राधानगरी ...

Jewelry stolen from a woman's purse on a bus trip | बस प्रवासात महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी

बस प्रवासात महिलेच्या पर्समधून दागिन्यांची चोरी

Next

पोलिसातून मिळालेली माहिती अशी कुंभार या सातारा येथून कोल्हापूरला नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. हा विवाह श्री लाॅन,राधानगरी रोड येथे होता. हा विवाह समारंभ आटाेपून गावी जाण्यासाठी नणंदेने कारमधून तावडे हाॅटेल येथे साडेतीनला सोडले. यावेळी कुंभार यांनी अंगावरील दागिने काढून छोट्या पर्समध्ये ठेवून पर्स मोठ्या बॅगमध्ये ठेवली. दरम्यान तावडे हाॅटेल जवळ,कोल्हापूर- कराड बस आली असता,चार महिलांनी चेंगराचेंगरी करत बसमध्ये कुंभार चढल्या. वठार तर्फे वडगाव येथे दुपारी चारच्या सुमारास आल्या असता, पर्समधून सोन्याची दागिने व रोख रक्कम चोरल्याचे दिसून आले. त्यामुळे थेट तक्रार देण्यासाठी वडगाव पोलिसात आल्या. बसमध्ये चढताना ६० हजार रूपये किमतीचा दोन तोळ्यांचा नेकलेस तसेच दीड लाखांचे पाच तोळ्यांचे गंठण असा २ लाख १० हजारांचा मुद्देमाल तर रोख ४० हजार रूपये असा ऐवज चोरून नेला.

चौकट :

वठार पोलीस चौकीची गरज...! महामार्गावर गुन्हा नियंत्रणासाठी पोलीस चौकी नुसती उभी केली आहे. काही अधिकाऱ्यांनी प्रतिमा उंचावण्यासाठी या वठार पोलीस चौकीचे उद्घाटन करतात....आणि उद्घाटनापासून बंद असणारी असा लौकिक झालेली ही चौकी आहे. आज जर पोलीस चौकी सुरू असती तर चोरटे पोलिसांना पकडता आले असते. अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

Web Title: Jewelry stolen from a woman's purse on a bus trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.