कागदात गुंडाळले दागिने, निघाले दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:42+5:302021-09-02T04:54:42+5:30

कोल्हापूर : पोलीस असल्याचे भासवून एका वृध्दाची सोन्याची चेन व अंगठी असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज दोघा भामट्यांनी हातोहात ...

Jewelry wrapped in paper, stones rolled out | कागदात गुंडाळले दागिने, निघाले दगड

कागदात गुंडाळले दागिने, निघाले दगड

Next

कोल्हापूर : पोलीस असल्याचे भासवून एका वृध्दाची सोन्याची चेन व अंगठी असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज दोघा भामट्यांनी हातोहात लंपास केला. ही घटना बुधवारी दुपारी कसबा बावडा येथील जयहिंद कॉलनीसमोर मटण दुकानासमोर घडली. याप्रकरणी विलासराव सुबराव जगताप (वय ८०, रा. श्री कॉलनी, लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विलासराव जगताप हे जयहिंद कॉलनी परिसरात चालत जात होते. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी भामट्यांनी रस्त्यात अडवले. ‘आम्ही पोलीस आहोत. पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे. तुम्ही बाहेर फिरू नका, तुमच्याजवळील चेन, अंगठी द्या’ असे त्यांना सांगितले. त्या परिस्थितीत जगताप भांबावले. त्यांनी आपल्याजवळील दहा ग्रॅमची सोन्याची चेन, बोटातील सोन्याची अंगठी काढून दिली. त्यावेळी त्या दोघा तरुणांनी ते दागिने कागदात गुंडाळल्याचा बनाव करून ते त्यांच्या हातात दिले. त्यानंतर ते दोघे तरुण भामटे पसार झाले. जगताप यांनी पुढे जाऊन कागद उघडून पाहिले असता, त्यामध्ये दोन दगड होते. त्यामुळे आपली फसगत झाल्याने त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा भामट्यांकडून वापर

वृध्दाला लुबाडताना दोघा भामट्यांनी, आपण पोलीस आहोत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे जाधवसाहेब चेकिंग करत आहेत असे सांगितले. अवघ्या आठवड्यापूर्वी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव माहिती असल्याने, हे दोघे भामटे स्थानिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. फसविणाऱ्या दोघाही भामट्यांचे वर्णन वृध्द जगताप यांनी पोलिसांना सांगितले.

Web Title: Jewelry wrapped in paper, stones rolled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.