जे.एफ. पाटील यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:04+5:302021-08-29T04:25:04+5:30

येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून दिला जाणारा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ ...

J.F. Patil to D.Y. Patil University Lifetime Achievement Award | जे.एफ. पाटील यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार

जे.एफ. पाटील यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार

Next

येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून दिला जाणारा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांना जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी १ सप्टेंबर रोजी पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रा. पाटील यांनी दीर्घकाळ शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याशिवाय विद्यापीठ व सामाजिक संस्था, सरकारच्या विविध मंडळांवर सदस्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य होते. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांची इंग्रजी व मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्रातून व मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत.

डॉ. प्रा. पाटील यांच्या या निवडीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: J.F. Patil to D.Y. Patil University Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.