पद्माराजे महिला संघटनेतर्फे झिम्मा फुगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:28+5:302021-09-19T04:25:28+5:30
सहभागी महिलांनी नऊवारी साडीसह पारंपरिक वेश परिधान केला होता. यावेळी झिम्मा फुगडी, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धा पार ...
सहभागी महिलांनी नऊवारी साडीसह पारंपरिक वेश परिधान केला होता. यावेळी झिम्मा फुगडी, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धा पार पडल्या. यावेळी अध्यक्षा सरिता सासणे म्हणाल्या, महिलांचे पारंपरिक खेळ नव्या पिढीला माहिती व्हावेत यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये चारशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी आरती वाळके, स्मिता हराळे, गीता डाकवे, सरिता सुतार, मंगल आम्रे, प्रमिला भोसले, विद्या भालकर, अश्विनी भालकर, राजश्री चव्हाण, कल्पना मोरे, निकिता मोरे, शिल्पा मोरे, छाया पाटील, अलका सासणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
१८०९२०२१ कोल झिम्मा फुगडी
गणेश उत्सवानिमित्त शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.