जिगरबाज कस्तुरीची ‘एव्हरेस्ट‘ मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:26+5:302021-03-19T04:21:26+5:30

कोल्हापूर : अत्यंत खडतर समजले जाणारे जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ सर करायचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाच्या मनी कायम असते. ...

Jigarbaaz Kasturi's 'Everest' expedition begins | जिगरबाज कस्तुरीची ‘एव्हरेस्ट‘ मोहीम सुरू

जिगरबाज कस्तुरीची ‘एव्हरेस्ट‘ मोहीम सुरू

Next

कोल्हापूर : अत्यंत खडतर समजले जाणारे जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ सर करायचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाच्या मनी कायम असते. हे स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य अत्यंत कमी लोकांच्या वाट्याला येते. त्यांपैकीच एक कोल्हापूरची कस्तुरी दीपक सावेकर ही भाग्यवान आहे. स्वप्नपूर्तीसाठी ती दोन दिवसांपूर्वीच काठमांडूमध्ये पोहोचली आहे. तिची ही मोहीम ७० दिवसांची असून प्रत्यक्षात ती १५ मेदरम्यान एव्हरेस्टवर चढाई करणार आहे.

कस्तुरीने अत्युच्च समजले जाणारे ८ हजार ८४८ मीटर उंचीवरील हे शिखर सर करण्यासाठी लागणारी पात्रता पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात ती एव्हरेस्ट शिखरावर जाण्यापूर्वी आयलँड पीक समिट तिला करावे लागणार आहे. त्यानंतर ती एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला २० एप्रिलला पोहोचणार आहे. तेथे तिचा चढाईचा रोजचा सराव सुरू राहणार आहे. प्रत्यक्षात १५ मे २०२१ रोजी ती अंतिम चढाईसाठी रवाना होणार आहे. या काळात वेदर विंडो ओपन अर्थात चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना अनुकूल वातावरण निर्माण होते असे मानले जाते. चढाईसाठी हे वातावरण सोयीचे ठरते. त्यामुळे हा काळ मोठ्या मोहिमा सर करण्यासाठी पोषक मानला जातो. कस्तुरी १५ मे पूर्वीही चढाई करण्यासाठी रवाना होऊ शकते. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती ही मोहीम यशस्वी करून कोल्हापुरात परतणार आहे, अशी माहिती वडील दीपक सावेकर यांनी दिली.

कस्तुरीची गिर्यारोहणातील कामगिरी अशी,

- ॲडव्हेंचर स्पोर्टसमधील अतुलनीय कामगिरीबद्दल वयाच्या चौदाव्या वर्षी २०१७ संरक्षण सचिव प्रशंसापत्र

- वयाच्या पंधराव्या वर्षी २०१८ ला तिने गिर्यारोहणातील ॲडव्हान्स्ड समजल्या जाणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमधून अद्ययावत शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान तिचे १५७०० फुटांवरील ‘क्षितीधार बेस कॅम्प’ पूर्ण.

- कातळधार, कळकराय, कळसूबाई, हरिश्चंद्र, लिंगाणा, संदकफू शिखर (११,९२९ फूट).

- अत्यंत कठीण समजला जाणारा माऊंट मेरा पीक (२१ हजार २४६ फूट) १२ दिवसांची मोहीम सर

कोट

जगातील सर्वांत उंच समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्टवर करवीरनगरीचा झेंडा फडकावूनच मी परतेन.

कस्तुरी सावेकर,

गिर्यारोहक

कोट

मोहिमेसाठी ४२ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. यापैकी ३२ लाख रुपये जमले आहेत. उर्वरित रकमेसाठी दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी सहकार्य करावे.

दीपक सावेकर,

कस्तुरीचे वडील.

फोटो : १८०३२०२ॅ१-कोल-कस्तुरी सावेकर

Web Title: Jigarbaaz Kasturi's 'Everest' expedition begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.