कार्यकर्त्यांचा जिगरबाज नेता : संजयबाबा घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:23 AM2021-04-22T04:23:08+5:302021-04-22T04:23:08+5:30
यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त........ तालुक्यात बाबा गट म्हणून सर्वत्र ओळखला जातो. सामान्य कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांचा एक साखर कारखाना असावा, अशी ...
यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त........
तालुक्यात बाबा गट म्हणून सर्वत्र ओळखला जातो. सामान्य कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांचा एक साखर कारखाना असावा, अशी कार्यकर्त्यांची वारंवार मागणी होत होती. दोन वर्षांपूर्वी आडी मलया याठिकाणी बाबा गटाच्या कार्यकर्त्यांनी मीटिंग घेऊन आपल्या गटाचा हक्काचा एक साखर कारखाना असावा, याबाबत चर्चा होऊन साखर कारखाना झालाच पाहिजे, असा चंग कार्यकर्त्यांनी बांधला. बाबांना त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी साकडे घातले. शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स लिमिटेड, केनवडे या डोंगरमाथ्यावर कारखान्याचा बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच पहिला गळीत हंगाम शुभारंभ यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. खरं म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागाचे हे एक प्रतीक होते. कागल तालुक्यातील पाचवा साखर कारखाना सुरू होत असताना बाबा गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. साखर कारखाना हा कार्यकर्त्यांना नवीन नाही; परंतु प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या आणि अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांसाठी ते एक भूषण होते, म्हणूनच गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी केनवडे येथील डोंगर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झालेले दिसत होते. अनेक माता-भगिनी आंबील, घुगऱ्या, पुरणपोळी, गारवा घेऊन आनंदाने हा साखर कारखाना डोळे भरून पाहत होत्या. अनेक वेळा विधानसभेसाठी झालेला पराभव त्यांनी पचवला. अन्नपूर्णा साखर कारखान्याचे शेअर्स जमा करण्यासंदर्भात फक्त आव्हान करताच हजारो कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून शेअर्स घेतले आणि अन्नपूर्णा शुगरचा प्रथम गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. संजयबाबा घाटगे यांनी १९९२ मध्ये अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. व्हन्नाळी, साके, केनवडे, गोरंबे, शेंडूर, सावर्डे खुर्द, सावर्डे बुद्रुक, हादनाळ, बामणी या डोंगराळ भागातील गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करून त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले.
खरं म्हणजे अन्नपूर्णा पाणीपुरवठा सर्व संस्थांची मातृसंस्था आहे. महाराष्ट्र शासनाने अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेचा सहकारभूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार देऊन दोन वेळा गौरव केलेला आहे. बाबांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळ आणि सचिव आकाराम बचाटे, उपसचिव रघुनाथ पाटील आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग या टीमने पाण्याचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहे. त्यामुळेच पांढऱ्या पट्ट्यातील गावे सुजलाम् सुफलाम् झालेले आज आपणास दिसत आहेत. अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेमुळे या पंचक्रोशीतील शेतकरी दूध व ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. मुबलक ऊस असल्यामुळेच अन्नपूर्णा शुगरची निर्मिती झाली आहे. या प्रकल्पामुळे केमिकलफ्री पावडर, त्याचबरोबर सल्फरफ्री साखर तयार होणार आहे. प्रतिदिनी पंधराशे मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भावी काळात शेतकऱ्यांना ऊस शेतीतील नवीन नवीन शेती तंत्रज्ञान, पाणीव्यवस्थापन ठिबक सिंचन इत्यादी धोरणाची माहिती कारखान्यामार्फत गावागावांत चर्चासत्रे घेऊन ऊस विकास योजनेंतर्गत ऊस विकास मळा योजना राबविणार आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारून उत्पादनवाढीसाठी माफक दरामध्ये खतपुरवठा केला जाणार आहे. जमिनीचे आरोग्य सुपीकता व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कारखान्यामार्फत मातीपरीक्षण प्रयोगशाळा उभारण्याचा मानस आहे. कारखाना कार्यस्थळावर अद्ययावत फळबाग व नर्सरी निर्माण करणार असून, नर्सरीमध्ये एक डोळा ऊस रोपे तयार करून माफक दरामध्ये दिली जाणार आहेत.
आपण जनतेचे काम करतो म्हणजे आपण उपकार करत नसून, ते आपले कर्तव्यच आहे, अशा भावनेने संजयबाबा हे सामान्य जनतेशी वेग वेगळ्या मार्गाने संपर्क साधत असतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात संजयबाबा घाटगे यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. कागल पंचायत समिती सभापती या नात्याने त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत सामान्य जनतेशी जोडली गेलेली नाळ हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य आधार ठरला आहे. शेतकरी, शेतमजूर दीनदलित समाज हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. कागल तालुका शिक्षणाचा प्रसारात त्यांचे मोठे योगदान आहे. दोन अनुदानित हायस्कूल, इंग्रजी मेडियम स्कूल, आयटीआय महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रसार संजयबाबांंनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद अल्पकालावधीत मिळालेली आमदारकी आणि गोकुळ दूध संघ याठिकाणी त्यांना जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी संधीचे सोने केले आहे. व्हनाळी, ता. कागल येथील शेरी नावाच्या शेतामध्ये बाबांचे वास्तव्य आहे. त्यांचे शेतावर प्रचंड प्रेम आहे. शेतामध्ये गेल्यानंतर ऊस व इतर पिके त्याचबरोबर आंब्यांच्या बागा पाहिल्यानंतर येथे येणारे कार्यकर्ते भारावून जातात. कोणत्याही निवडणुका असू देत, कितीही काम असू दे; पण ते शेताचे नियोजन स्वतः करतात आणि योग्य त्या सूचना देऊन पुढील राजकीय नियोजन करतात. गोरगरिबांच्या अशा स्वाभिमानी नेत्याला उदंड आयुष्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा.
-तानाजी पाटील, साके