जनावरांना वाचवताना गेले जिजाबाई मोहिते यांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:22+5:302021-09-03T04:24:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील तलाव फुटल्याची बातमी समजल्यावर पती धनाजी आणि मुलगा, नातू यांच्यासोबत ...

Jijabai Mohite's life was saved while saving animals | जनावरांना वाचवताना गेले जिजाबाई मोहिते यांचे प्राण

जनावरांना वाचवताना गेले जिजाबाई मोहिते यांचे प्राण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील तलाव फुटल्याची बातमी समजल्यावर पती धनाजी आणि मुलगा, नातू यांच्यासोबत ओढ्याच्या काठी असलेल्या गोठ्यातील जनावरे सोडण्यासाठी गेलेल्या नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते (वय ५५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बुधवारी रात्री मेघोली येथील तलाव फुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह नवले गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यातून जाऊ लागला. या ओढ्याच्या काठावर धनाजी मोहिते यांचा जनावरांचा गोठा आहे. तलाव फुटल्याचे समजल्यावर ते आपली पत्नी जिजाबाई मुलगा आणि नातवाला सोबत घेऊन जनावरे सोडण्यासाठी गेले. ते सर्वजण आपल्या गोठ्यात जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. काही जनावरे सोडलीत, पण अचानक पाण्याचा लोंढा आल्यामुळे अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले. पती धनाजी व मुलगा, नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर पडले; परंतु जिजाबाई या वाहून गेल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले. त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, नातू असा परिवार आहे.

नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने मोठे नुकसान झाले. मोहिते आपल्या कुटुंबासह कसेबसे बाहेर पडले; परंतु त्यांची एक बैल, तीन म्हशी अशी चार, तर या पाण्यात एकूण अकरा जनावरे गोठ्यातच मरून पडली आहेत.

फोटो ओळ

मृत जिजाबाई मोहिते

Web Title: Jijabai Mohite's life was saved while saving animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.