शाहू मिलच्या जागेत लवकरच रोजगार निर्मिती केंद्र, मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

By संदीप आडनाईक | Published: November 14, 2022 01:22 PM2022-11-14T13:22:48+5:302022-11-14T13:23:40+5:30

कल्याणकारी मंडळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन.

Job creation center soon in Shahu mill premises, Minister Chandrakant Patil made the announcement | शाहू मिलच्या जागेत लवकरच रोजगार निर्मिती केंद्र, मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

शाहू मिलच्या जागेत लवकरच रोजगार निर्मिती केंद्र, मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

Next

कोल्हापूर : हेरिटेज म्हणून जाहीर असलेली शाहू मिलची अकरा एकर जागा सोडून, उर्वरित जागेत रोजगार निर्मितीसाठी भागीदारीत वस्त्रोद्योग पब्लिक प्रायव्हेट कंपनी लवकरच सुरू करण्यात येईल. याबाबतची अधिकृत घोषणा वस्त्रोद्योग मंत्री म्हणून १ जानेवारीपूर्वी करत असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कल्याणकारी मंडळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

भरमसाठ वाढलेल्या विम्याच्या दराबाबत पुण्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावेळी सुभाष शेटे, ईश्वर चनी, शंकर पंडित, रमेश पोवार, राजू पोवार, अविनाश दिंडे, नरेंद्र पाटील यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यात श्रीकांत पाटील, जाफर मुजावर, चंद्रकांत ओतारी, प्रसाद शिंदे, संजय पाटील, शशिकांत ढवण, राहुल लायकर, बाळू सादिलगे, मनसेचे राजू जाधव, कॉमन मॅनचे बाबा इंदूलकर यांचा समावेश होता.

रिक्षा व्यावसायिकांनी मांडले चंद्रकांत पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे

कोल्हापूर शहर आणि जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा व्यावसायिक समितीने रविवारी कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख घटक असलेल्या तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांच्या व्यथांचे गाऱ्हाणे मांडले.

Web Title: Job creation center soon in Shahu mill premises, Minister Chandrakant Patil made the announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.