कोल्हापूरात एनएसयुआयचे शिक्षण मंत्र्यांच्या ‘प्रतिमेस’ जोडे मोरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:06 IST2019-01-07T15:04:34+5:302019-01-07T15:06:04+5:30
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने शिक्षण मोफत देणार का? असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून संबधित विद्यार्थ्यांस ‘शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा’ असे उत्तर देत, त्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. या निषेधार्थ सोमवारी शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेस एनएसयुआयकडे जोडे मोरो आंदोलन केले.

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करताना एनएसयुआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया : दीपक जाधव)
कोल्हापूर : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने शिक्षण मोफत देणार का? असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून संबधित विद्यार्थ्यांस ‘शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा’ असे उत्तर देत, त्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. या निषेधार्थ सोमवारी शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेस एनएसयुआयकडे जोडे मोरो आंदोलन केले.
मिरजकर तिकटी येथे झालेल्या आंदोलनाप्रसंगी बोलताना एन. एस.यु. आयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणारे भाजपा सरकार शिक्षण क्षेत्रात मनुवादी विचार घुसडवण्याचा प्रयत्न करत आहे.
या विचारा विरोधात कोल्हापूर जिल्हा नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडिया तर्फे हे आंदोलन करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सूजय चव्हाण, निखिल कांबळे, मनोज दळवी, सत्यजित शेजवळ, अक्षय शेळके, यश शिर्के, अशुतोष मगर, किरण मोहिते आदि उपस्थित होते.