जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:57 PM2019-08-20T14:57:52+5:302019-08-20T14:59:16+5:30
आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते.
निपाणी : आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते.
कर्नाटक मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांना कॅबिनेट मंत्री म्हणून भाजपाने मोठी संधी दिली आहे. जोल्ले यांच्यारूपाने निपाणी तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे.
२००८ साली पराभव झाल्यानंतर २०१३ साली त्यांनी विजय मिळवत निपाणी मतदार संघात पहिल्या महिला आमदार म्हणून मान मिळवला. यानंतर सलग ५ वर्षे मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासकामे केली. पक्ष वाढीसाठीही त्यांनी मोठे काम केले. यामुळेच त्यांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळाले आहे.
मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी जोल्ले यांना त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. माजी आमदार लक्ष्मण सवदी यांचीहि या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.