मान्यवरही दौडले जोशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:56 PM2019-01-06T23:56:25+5:302019-01-06T23:57:05+5:30

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची यंदा इतकी हवा झाली की यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक ...

Joshi was also a good man! | मान्यवरही दौडले जोशात!

मान्यवरही दौडले जोशात!

Next

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची यंदा इतकी हवा झाली की यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. अगदी वेळेआधी पोलीस मैदानावर येत या सर्वच मान्यवरांनी आपण स्पर्धक म्हणून सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
खासदार संभाजीराजे यांनी एकीकडे महामॅरेथॉनचे उद्घाटन केल्यानंतर पाच किलोमीटर धावण्यासाठी थेट स्टार्टिंग पॉर्इंट गाठला. संभाजीराजेच आपल्यासोबत धावणार आहेत म्हटल्यावर उपस्थितांचाही उत्साह वाढला.
दरम्यान, त्याआधीच १० किलोमीटरसाठी आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, त्यांच्या पत्नी रूपाली यांनी धाव घेतली होती.
जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन निंबाळकर, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक संदीप नरके, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
डॉ. संजय शिंदे, राहुल कदम, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक
औदुंबर पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष समीत कदम, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर, आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाचे कौतुक केले.
शासकीय अधिकाऱ्यांनी महामॅरेथॉन केली एंजॉय
नेहमी प्रशासकीय कामांच्या व्यापात असणाºया शासकीय अधिकाºयांनी ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन चांगलीच एंजॉय केली. महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभाग अशा गटांनी आलेले अधिकारी एकत्र आल्यानंतर मात्र हास्यविनोद, सेल्फी, फोटो यांतच गुंग झाले. धावताना मात्र सर्वांनी आपापला ग्रुप करत मॅरेथॉन पूर्ण केली.

Web Title: Joshi was also a good man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.