जोतिबा चैत्र यात्रा: सासनकाठ्या पूजनावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:54 PM2022-04-08T12:54:54+5:302022-04-08T12:55:38+5:30

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली.

Jotiba Chaitra Yatra: Strict police security during Sasankatha Puja, District Collector instructions | जोतिबा चैत्र यात्रा: सासनकाठ्या पूजनावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

जोतिबा चैत्र यात्रा: सासनकाठ्या पूजनावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर दोन वर्षांनी श्री जोतिबा यात्रा होत असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी मानाच्या सासनकाठ्यांच्या पूजनावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत संदेशाची देवाणघेवाण करता येण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टिमसह पर्यायी संदेश व्यवस्था तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी केल्या. यावेळी त्यांनी दर्शन मंडप व मंदिर परिसराची पाहणी केली.

वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा १६ तारखेला होत आहे. किमान ७ ते ८ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीची आढावा बैठक पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस विभागाच्या तयारीची माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या तयारीबाबत, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी देवस्थान समितीच्या तयारीची माहिती दिली. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे, तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरपंच राधा बुणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी बजावले..

  • डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका.
  • भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, बसवाहतूक, पार्किंग, आरोग्य सोयी- सुविधा पुरवा.
  • रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे, रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून घ्या.
  • डोंगरावरील अंतर्गत रस्ते, वाहनतळ मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करा.
  • दर्शन रांग मार्गाची तसेच चालत जाण्याच्या मार्गावर दगड, खडी येऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्ती करुन घ्यावी.
  • भाविकांना पिण्याचे पाणी अपुरे पडू नये, यासाठी जादा क्षमतेचे पाण्याचे टँकर पुरवा.
  • फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करुन घ्या. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पंप सुस्थितीत असल्याची खात्री करा.
     

रस्त्यावर गाड्या लागणार नाहीत...

दर्शन मंडप उभारणी व मंदिर परिसराची पाहणी केल्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास सहजपणे बाहेर पडता येण्यासाठी रस्त्यावर गाड्या लावण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेऊन वाहनतळाची व्यवस्था करावी. दुचाकी, चारचाकी वाहनतळ, दर्शन मार्ग, बाहेर पडण्याचा मार्गाचे माहितीफलक त्या त्या ठिकाणी लावण्यात यावेत. रुग्णवाहिका तैनात ठेवावी. आगीपासून सुरक्षेसाठी व्यावसायिक व स्थानिकांनी आग प्रतिबंधक नळकांडी ठेवून खबरदारी घ्यावी. भेसळयुक्त अन्न पदार्थ व भेसळयुक्त गुलालाची विक्री होणार नाही याची काळजी घ्या. यात्रेनंतर डोंगर परिसरात कचरा राहू नये तसेच दुर्गंधी होऊ नये यासाठी स्वच्छता, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करा.

Web Title: Jotiba Chaitra Yatra: Strict police security during Sasankatha Puja, District Collector instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.