दिवाळी पाडव्यानिमित्त जोतिबाची पगडी सरदारी बैठी महापुजा, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:26 PM2022-10-26T12:26:43+5:302022-10-26T12:27:51+5:30

सलग सुट्टीमुळे पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Jotiba turban Sardari sit Mahapuja on the occasion of Diwali Padwa | दिवाळी पाडव्यानिमित्त जोतिबाची पगडी सरदारी बैठी महापुजा, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दिवाळी पाडव्यानिमित्त जोतिबाची पगडी सरदारी बैठी महापुजा, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next

दत्तात्रय धडेल

जोतिबा : दिवाळी पाडव्यानिमित्त श्री.जोतिबा देवाची पगडी सरदारी बैठी महापुजा बांधण्यात आली. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर देवदर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी केली. पहाटे ५ वाजता महाभिषेक करण्यात आला. सकाळी ६ वाजता पगडी सरदारी बैठी महापुजा बांधण्यात आली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीस सुरुवात झाली. सलग सुट्टीमुळे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

पाडव्यासाठी कोल्हापुरातील बाजारपेठ सज्ज

दिवाळी उत्सवांतर्गत आज, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी होत आहे. दिवाळी पाडवा हा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने कोल्हापुरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे.

प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणातील पाडवा म्हणजे वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवसाला केलेले कोणतेही शुभकार्य, खरेदी हे कुटुंबासाठी सुख-समृद्धीचे असते, असे मानले जाते. तर भाऊ बहिणीच्या नात्याची वीण अधिक घट्ट बनते ती भाऊबीजने. बहीण-भावाचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यंदा हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने आनंद द्विगुणित होणार आहे.

निर्बंध आणि निराशेचे मळभ सरल्याने यंदाची दिवाळी सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांच्याही आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद घेऊन आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सेवेसाठी अनेक उत्पादने बाजारात आणली असून त्यावर आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. कमी पैशात दुहेरी फायदा मिळत असल्याने ग्राहकांनीही दिवाळीआधीच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम अप्लायन्सेस, फर्निचर, दुचाकी-चारचाकी वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर या वस्तूंचे घराघरात आगमन होणार आहे. दुसरीकडे पाहुण्यांची मांदियाळी आणि पंचपक्वान्नांची रेलचेल असणार आहे.

Web Title: Jotiba turban Sardari sit Mahapuja on the occasion of Diwali Padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.