Kolhapur- जोतिबा डोंगरावर लाखोंच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 02:26 PM2023-09-04T14:26:52+5:302023-09-04T15:37:20+5:30

दीपक जाधव  कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेला लाखोंच्या उपस्थितीत सुरुवात ...

Jotiba Wadi Ratnagiri on the third Monday of the month of Shravan the Nagar Pradakshina begins in the presence of lakhs | Kolhapur- जोतिबा डोंगरावर लाखोंच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात

Kolhapur- जोतिबा डोंगरावर लाखोंच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात

googlenewsNext

दीपक जाधव 

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेला लाखोंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ही दिंडी पुर्ण केल्या नंतर बारा जोतिर्लिग व चारधाम यात्रा केल्याचे पुण्य लाभत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

सकाळी साडेनऊ वाजता मुख्य मंदीरातून दिडी सोहळ्याची सुरुवात झाली. तत्पूर्वी विणा पुजना नंतर डवरी मार्गस्थ झाले. दिंडीच्या मध्यभागी विणा व डमरू घेऊन डवरी होते. त्यांच्या सोबत भगवे ध्वज घेऊन पुजारी व भाविक होते. धार्मिक विधी पुर्ण झाल्या नंतर मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून दिडी बाहेर पडून गायमुखाकडे मार्गस्थ झाली.

दिंडीच्या मार्गावर भाविकासाठी विविध संस्था व भक्तांनी केळी, राजगिरा लाडू, खिचडी, पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. या दिंडीचा २५ कि.मी चा प्रवास भाविकांकडून पायात चप्पल न घालता रानातून चिखल तुडवत पार केला जातो. ही दिंडी पुर्ण होई पर्यंत भाविक बसत नाहीत. संध्याकाळी ७ नंतर दिडी अकरा जोतिर्लिगाचे दर्शन घेऊन यमाई मंदीर येथे आल्यानंतर आरती होईल व सुटवडा वाटपाने दिंडीची सांगता होईल.

Web Title: Jotiba Wadi Ratnagiri on the third Monday of the month of Shravan the Nagar Pradakshina begins in the presence of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.