‘सावित्रीबाई फुले’मध्ये जम्बो भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:15 PM2020-02-26T13:15:13+5:302020-02-26T13:18:45+5:30

सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स, लिपिक अशा ३२ महत्त्वाच्या पदांची जम्बो भरती प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ठोक मानधनावर भरती केली जात आहे. या भरतीनंतर येथील रुग्णसेवा आणखीन गतिमान होणार आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत थांबावे लागणार नाही.

Jumbo Recruitment in 'Savitribai Flowers' | ‘सावित्रीबाई फुले’मध्ये जम्बो भरती

‘सावित्रीबाई फुले’मध्ये जम्बो भरती

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सावित्रीबाई फुले’मध्ये जम्बो भरतीवैद्यकीय अधिकारी, नर्स, लिपिक अशी ३२ पदे ठोक मानधनावर भरणार

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स, लिपिक अशा ३२ महत्त्वाच्या पदांची जम्बो भरती प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ठोक मानधनावर भरती केली जात आहे. या भरतीनंतर येथील रुग्णसेवा आणखीन गतिमान होणार आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत थांबावे लागणार नाही.

गोरगरिबांना महापालिकेचे सावित्रीबाई फुले रुग्णालय हे आधारवड आहे. रुग्णालयामध्ये साधनसामुग्रीअभावी दयनीय अवस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वीपासून यामध्ये बदल होत आहे. अतिदक्षता विभाग सुरूकरण्यात आला आहे.

तसेच महात्मा फुले जीवनदायी योजना, आयुष्यमान आरोग्य योजनेमध्ये रुग्णालयाचा समावेश झाला आहे. या सर्वांमुळे उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. एकीकडे असे चित्र असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जावे लागत आहे.

  • आवश्यक पदे -३३८
  • मंजूर पदे -१८१
  • कार्यरत पदे -१३२
  • रिक्त पदे -२०३
  • मंजूर पदानुसार रिक्त पदे -५३
  • उपचारासाठी दररोज येणारे बाह्य रुग्ण : ६५०
  • दररोज अ‍ॅडमिट असणारे रुग्ण - ८०
  • अतिदक्षता विभागातील रुग्ण - ६
     

अपुऱ्या मनुष्यबळाचे परिणाम

  •  सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर डबल ड्यूटी करण्याची वेळ
  • रुग्णसेवेवर परिणाम
  •  रुग्णालयाची प्रतिमा खराब
  • शासकीय योजना रद्द होण्याचा धोका


विभागच बंद ठेवण्याची वेळ

रुग्णालयामध्ये ५ एक्स-रे टेक्निशियन आवश्यक असताना केवळ दोनच कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी एक टेक्निशियन सुट्टीवर असल्याने तसेच दुसऱ्या टेक्निशियनला आॅपरेशन थिअटरमध्ये मदतीसाठी घेतल्याने एक्स-रे विभागच बंद ठेवावा लागला.

पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे

  • वैद्यकीय अधिकारी १३ ५ ८
  • भूलतज्ज्ञ ५ २ ३
  • वॉर्डबॉय, सफाई, झाडू कामगार ३६ १९ १७
  • कनिष्ठ लिपिक ३ - ३
  • लॅब टेक्निशियन ९ ३ २

 

भरती करण्यात येणारी पदे

वैद्यकीय अधिकारी (अस्थिरोग) २, वैद्यकीय अधिकारी (जनरल)२, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) २, वैद्यकीय अधिकारी (जनरल मेडिसीन) ३, वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ज्ञ) ३, वैद्यकीय अधिकारी ३, स्टाफ नर्स १०, मिश्रक तथा लिपिक ५, फिजिओथेरीपिस्ट २ .
 

 

Web Title: Jumbo Recruitment in 'Savitribai Flowers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.