गूळ सौदे बंदच; शेतकऱ्यांचे नुकसान : बाजार समितीत तिसºया दिवशीही वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:54 AM2019-02-22T00:54:52+5:302019-02-22T00:55:07+5:30
कोल्हापूर : व्यापारी व माथाडी यांच्यातील गुळाची गाडी भरण्याच्या वेळेवरून सुरू असलेला वाद चिघळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ ...
कोल्हापूर : व्यापारी व माथाडी यांच्यातील गुळाची गाडी भरण्याच्या वेळेवरून सुरू असलेला वाद चिघळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ सौदे गुरुवारी तिसºया दिवशीही बंद राहिले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुमारे दोन कोटींचे जवळपास ४० हजार रवे बाजार समितीमध्ये पडून आहेत.
दरम्यान, गुरुवारी गूळ उत्पादक शेतकºयांच्या व्यापक शिष्टमंडळाने बाजार समिती प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले. हंगाम अंतिम टप्प्यात असताना या वादात गुळाचे दर पाडले जात असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. त्याकरिता वेळेचे बंधन न घालता २४ तास गुळाची आवक व जावक सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीमध्ये गूळ व्यापारी व माथाडी यांच्यात वेळेवरून वाद सुरू आहे. सोमवारी (दि. १८) सहा व्यापाºयांनी माथाडींकडून एक तास जादा काम करून घेतले. त्यातून माथाडी कामगारांनी बुधवारी (दि. २०) तिरूपती ट्रेडर्स, अजितकुमार नवरलाल शहा, पद्मावती ट्रेडिंग कंपनी, रावळ एंटरप्रायजेस, जे. के. ट्रेडर्स व खोडीदास नेमचंद शहा या सहा व्यापाºयांचे सौदे काढले नाहीत. या व्यापाºयांचा माथाडींशी पुन्हा जोरात वाद झाला. दुपारनंतर सौदे काढण्यास माथाडी तयार झाले; परंतु माथाडी या सहा व्यापाºयांकडे आलेच नाहीत; त्यामुळे चिडून गुरुवारी या व्यापाºयांनी गूळ सौदे बंद ठेवले. व्यापारी व माथाडी आपापल्या भूमिकेशी ठाम असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
या वादाचा फटका बसल्याने संतप्त झालेल्या गूळ उत्पादक शेतकºयांनी गुुरुवारी थेट बाजार समितीत येऊन प्रशासनाला जाब विचारला. नुकसान टाळण्यासाठी २४ तास गुळाची आवक-जावक सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.शिष्टमंडळात भगवान काटे, सागर चौगुले, अजित पाटील, संतोष तोरसे, सुवर्णसिंग किल्लेदार, अमित पाटील, विजय लाड, संजय कांबळे, सचिन जाधव, श्रीपती कळके, आदींसह तुरंबे, तळाशी, खुपीरे, पोर्ले, अर्जुनवाडा, वाघापूर, कोलोली, फुलेवाडी, माजगाव, भुयेवाडी, लाडवाडी, तिरपण येथील गूळ उत्पादक शेतकºयांचा समावेश होता.
वादावर आज बैठक
सौदे बंद राहिल्याने शेतकºयांचे नुकसान होत असल्याने सचिव मोहन सालपे यांनी आज, शुक्रवारी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.
गुरुवारी पाच व १० किलोच्या गुळाचे सौदे बंद राहिले. असे असले तरी एक किलो गुळाच्या १० हजार बॉक्सचे सौदे काढण्यात आले.