जांभळीची गाय ‘गोकुळ श्री’
By Admin | Published: September 12, 2015 12:15 AM2015-09-12T00:15:38+5:302015-09-12T00:52:56+5:30
दोन गटांत स्पर्धा : रेंदाळच्या राजेंद्र कोल्हापुरेंची म्हैस प्रथम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने घेण्यात आलेल्या जास्तीत जास्त दूध देणारी म्हैस व गाय स्पर्धेत जांभळी (ता. शिरोळ) येथील मंगलमूर्ती दूध संस्थेच्या प्राची अभय पाटील यांच्या गायीने, तर रेंदाळ येथील शेतकरी दूध संस्थेचे राजेंद्र चंद्रकांत कोल्हापुरे यांच्या म्हशीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना संघाच्या शुक्रवारी (दि. १८) होणाऱ्या सभेत सन्मानित करण्यात येणार आहे. ‘गोकुळ’ गेल्या २५ वर्षांपासून या स्पर्धा घेते. जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबर दुग्ध व्यवसायाला बळकटी देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. जातिवंत गाय व म्हैस, मादी वासरू संगोपन योजना संघाने सुरू केली आहे. या योजनेतून आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक जातिवंत वासरांची नोंद झाली असून, १५ कोटी रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळालेले आहे. ‘गोकुळ श्री’ स्पर्धा गाय व म्हैस गटात घेण्यात आली. म्हैस गटात राजेंद्र कोल्हापुरे यांच्या म्हशीने प्रथम, गुडाळच्या पुष्पा पाटील यांच्या म्हशीने द्वितीय, तर लिंगनूरच्या काशिनाथ घुगरे यांच्या म्हशीने तृतीय क्रमांक पटकाविला. गाय गटात जांभळीच्या प्राची पाटील यांच्या गायीने प्रथम, मुरगूडच्या ज्ञानदेव गोधडे यांच्या गायीने द्वितीय, तर सांगलीच्या सतीश चौगले यांच्या गायीने तृतीय क्रमांक पटकाविला. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, या स्पर्र्धेमुळे दूध उत्पादनवाढीबरोबर गुणवत्ता सुधारण्यास चांगली मदत झाली आहे. (प्रतिनिधी)
विजेत्यांची नावे व बक्षिसे म्हैस गट
संस्थेचे नावगावस्पर्धकाचे नावएक दिवसाचे दूध क्रमांकबक्षीस
शेतकरीरेंदाळ, हातकणंगलेराजेंद्र चंद्रकांत कोल्हापुरे१६.७०५प्रथम२० हजार
लक्ष्मीनारायणगुडाळ, राधानगरीपुष्पा दत्तात्रय पाटील१६.६६०द्वितीय१५ हजार
कामधेनूलिंगनूर, गडहिंग्लजकाशीनाथ मारुती घुगरे१६.४५०तृतीय१० हजार
गाय गट
मंगलमूर्ती महिलाजांभळी, शिरोळप्राची अभय पाटील ३६.८९५प्रथम२० हजार
दत्तमुरगूड, कागलज्ञानदेव गोपाळ गोधडे ३४.४००द्वितीय१५ हजार
मोहनराव शिंदेसांगलीसतीश प्रकाश चौगले ३४.३८०तृतीय१० हजार