नुसताच डांगोरा... कुठं हाय कर्जमाफी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:31 AM2019-04-09T00:31:53+5:302019-04-09T00:31:59+5:30

कोल्हापूर-गगनबावडा 40 कि.मी. राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना म्हणजे विकास नव्हे. पश्चिम ...

 Just Dangora ... where is the high debt waiver? | नुसताच डांगोरा... कुठं हाय कर्जमाफी?

नुसताच डांगोरा... कुठं हाय कर्जमाफी?

googlenewsNext

कोल्हापूर-गगनबावडा
40 कि.मी.

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना म्हणजे विकास नव्हे. पश्चिम पन्हाळा, गगनबावडा तालुक्याला मागासलेपणाचा डाग लागला आहे. तो पुसण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत एकही प्रयत्न झालेला नाही. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या नशिबी केवळ घोषणाच येतात. कर्जमाफीचा डांगोरा पिटला जातो, पण कोठे आहे कर्जमाफी? असा संतप्त सूर मतदारांमधून उमटला.
‘लोकमत’ प्रतिनिधीने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर धावणाऱ्या एस.टी.तील प्रवाशांशी संवाद साधला. आसळजचे तुकाराम म्हेत्तर म्हणाले, कसली निवडणूक अन् काय राव. सरकारकडून कर्जमाफीचा नुसता डांगोरा पिटला जातोय. रोजगाराला गेल्याशिवाय पोटं भरत नाय. साळवणच्या जाईबाई पाटील यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, ‘सरकार काय देते हेच माहिती नाही, आम्हासनी सगळी सारखीच. दोन घास मिळालं पायजेत.’ एवढेच दबक्या आवाजात बोलल्या. एस.टी. गगनबावड्याच्या दिशेने धावत होती, उन्हाच्या झळा खिडकीतून आत येत असल्याने घामाघूम झालेले निवडेचे केरबा पाटील म्हणाले, ‘कोठे आहे कर्जमाफी, दोन हजाराने काय होते राव. सरकारचं काम बरं हाय, पण आमचा ईचार कोण करतंय.’ शिरोली एमआयडीसीला नोकरीला असलेला अणदूरचा तरुण रणजित पाटील म्हणाला, सरकारचे काम चांगले असले तरी गगनबावड्यात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. ‘मागास’ तालुका म्हणून किती वर्षे ठपका सहन करायचा, येथे मोठा प्रकल्प उभा राहिला, तर रोजगाराचा प्रश्न मिटेल.
झुळूकही नाही...!
मतदान पंधरा दिवसांवर येऊन ठेपले तरी या भागात निवडणुकीची झुळूकही पाहावयास मिळत नाही.
कोण उमेदवार आहेत? सरकार कोणाचे यावे, असे वाटते? याबाबत बहुतांशी मतदार अनभिज्ञच दिसले.

Web Title:  Just Dangora ... where is the high debt waiver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.