बस सुस्थितीत तर मग अपघात झाला कसा -- महापालिका सर्वसाधारण सभा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:04 AM2017-10-10T00:04:10+5:302017-10-10T00:05:08+5:30

कोल्हापूर : के.एम.टी.ची अपघातग्रस्त बस जर सुस्थितीत होती तर मग या बसला अपघात झालाच कसा असा,

 Just how good was the accident - the General Assembly of the municipality: | बस सुस्थितीत तर मग अपघात झाला कसा -- महापालिका सर्वसाधारण सभा :

बस सुस्थितीत तर मग अपघात झाला कसा -- महापालिका सर्वसाधारण सभा :

Next
ठळक मुद्देचौकशी समितीच्या अहवालावर संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : के.एम.टी.ची अपघातग्रस्त बस जर सुस्थितीत होती तर मग या बसला अपघात झालाच कसा असा, प्रश्न सोमवारी झालेल्या महानगरपालिका सर्वसाधारण सभेत उपस्थितीत करत या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावरच संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शहरवासीयांची रक्तवाहिनी असलेल्या के.एम.टी.कडील सर्व बसेसचे तातडीने तांत्रिक लेखापरीक्षण करून घ्यावे, अशी मागणी सभेत करण्यात आली. शेवटी बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब ठेवण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.
अपघातातील मृतांच्या वारसांना तसेच सर्व जखमींना महापालिका सभेत सामावून घ्यावे, जखमींना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी सभेत अनेक सदस्यांनी केली. बस अपघातास केवळ कोणी एक चालक जबाबदार नाही तर संपूर्ण यंत्रणाच जबाबदार असल्याचा आक्षेपही अनेकांनी नोंदविला. संदीप कवाळे यांनी चर्चेला सुरुवात केली. मृत व्यक्तींच्या वारसांना तसेच जखमींना तातडीने मदत द्यावी, त्यांना नोकरीत सामावून घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली तर के.एम.टी.कडील गेल्या चार-पाच वर्षांतील कर्मचाºयांची कार्यक्षमता, आर्थिक उत्पन्न, अधिकाºयांचा उदासीन दृष्टिकोन या सगळ्यांमुळे कारभाराच्या चिंध्या झालेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरत आहे, असे सांगतानाच प्रा. जयंत पाटील यांनी सर्व बसेसचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली.
चौकशी समितीने बस सुस्थितीत होती, असा अहवाल दिला असेल तर मग अपघात कसा झाला, अशी थेट विचारणा शोभा कवाळे यांनी केली. या अपघातात कोवळ्या मुलासह दोन कर्ते पुरुष गेले, अनेक कमावती माणसं कायमची अपंग होणार आहेत, याला जबाबदार कोण, अशी विचारणासुद्धा त्यांनी केली. यावेळी शेखर कुसाळे, सुरेखा शहा, राहुल चव्हाण, विजय सूर्यवंशी यांनीही चर्चेत भाग घेतला. मृत तानाजी साठे यांच्या वारसाला तातडीने नोकरी दिली जाईल, पण अन्य दोन मृतांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत शासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

राऊत कुटुंबाला घर द्या मृत आनंदा राऊत यांची परिस्थिी अत्यंत गरिबीची आहे. त्याला राहायला सुद्धा घर नाही. पालिका प्रशासनाने राजेंद्रनगर येथे त्यांच्या कुटुंबाला घर द्यावे, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली, तसेच जर सुजल अवघडे व आनंदा राऊत यांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देण्यासाठी शासकीय परवानगी मिळवावी, तसेच जाहीर केलेली मदत आजच्या आज द्यावी, अशा सूचनाही शेटे यांनी केल्या.

संजय भोसलेंची दिलगिरी
के.एम.टी.चे अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले चौकशीवेळी मिळालेली माहिती सभागृहात देण्याचा प्रयत्न करत असताना अशोक जाधव यांनी त्यांना अडविले आणि जी चूक झाली त्याबद्दल आधी जनतेची माफी मागा, अशी मागणी केली. त्यावेळी भोसले यांनी घडलेल्या अपघाताबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले. आता फक्त के.एम.टी.चा कार्यभार माझ्याकडे असल्याने आर्थिक परिस्थितीचे सांगत नाही पण दोन महिन्यांच्या आत के.एम.टी.ला शिस्त लावण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रूट बंद करण्याची सूचना नव्हती
ताबूत विसर्जनाची मिरवणूक ज्या मार्गावरून जाणार होती, त्या मार्गावरील बस वाहतूक सुरू ठेवू नये, अशा प्रकारची कसलीही सूचना केएमटीला पोलीस खात्याकडून नव्हती. एवढेच नाही तर मागच्या काही वर्षांतही अशा प्रकारे कधी सूचना केलेली नव्हती. त्यामुळे मिरवणूकमार्गावरील बस सेवा सुरू ठेवण्यात आली होती, असे आयुक्तांनी सांगितले.

सगळ्यांचीच जबाबदारी
अपघाताला कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही तर ती आपणा सर्वांची जबाबदारी आहे, ती टाळता येणार नाही. त्यामुळे सर्वजण मिळून मृत व जखमींना शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भेटूया, अशी सूचना सुनील कदम यांनी केली.


...तर आयुक्तांना खुर्चीवर
बसू देणार नाही

गेल्या अठरा महिन्यांत परिवहन समितीच्या सभेला आयुक्त एकदाही उपस्थित राहिले नाहीत, यापुढे जर ते आले नाहीत तर त्यांच्या कार्यालयात येऊन आम्ही ‘परिवहन’चे सर्व सदस्य बसू. आयुक्तांना त्यांच्या खुर्चीवर बसून देणार नाही, असा इशारा नियाज खान यांनी सभेत दिला. आयुक्तांनी के.एम.टी.तील कर्मचाºयांचे राजकारण मोडून काढावे, अशी सूचना खान यांनी केली.

Web Title:  Just how good was the accident - the General Assembly of the municipality:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.