निम्मे पूरग्रस्त अनुदानाच्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:10+5:302021-08-26T04:27:10+5:30

जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे ७० हजारांवर कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यात घरात पाणी शिरल्याने ...

Just waiting for the half-flooded grant | निम्मे पूरग्रस्त अनुदानाच्या प्रतीक्षेतच

निम्मे पूरग्रस्त अनुदानाच्या प्रतीक्षेतच

googlenewsNext

जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे ७० हजारांवर कुटुंबांचे नुकसान झाले आहे. त्यात घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान, घर-गोठ्याची पडझड, पशुधनचे नुकसान, हस्तकला कारागीर, दुकान-व्यावसायिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पूर आला त्यावेळी अशा स्थलांतरित पूरग्रस्तांना पुढील काही दिवसांतच तातडीच्या रकमेचे वाटप केले होते. यंदा मात्र महिना झाला तरी निम्म्या पूरग्रस्तांना मदतीचा रुपयादेखील मिळालेला नाही. यंदा राज्य शासनाकडून १५ ऑगस्टच्या दरम्यान निधी आला. तो तालुक्यांना वर्ग करून गेल्या आठ दिवसांत त्याचे वाटप सुरू केले आहे.

--

सानुग्रह अनुदान वाटपाची सद्य:स्थिती

तालुका : पूरग्रस्तांची संख्या : अनुदान मिळालेले लाभार्थी : वाटप झालेली रक्कम : अनुदान न मिळालेले पूरग्रस्त : शिल्लक रक्कम

करवीर : २५ हजार ६०० : १० हजार ७९२ - ५ कोटी ३९ लाख ६० हजार : १४ हजार ८०८ : १ कोटी ४० हजार

शिरोळ : १८ हजार ७५८ : १० हजार १५७ : ५ कोटी ७ लाख ८५ हजार : ८ हजार ६०१ : ०

इचलकरंजी शहर : ७ हजार ६०० : १ हजार ५३६ : ७६ लाख ८० हजार : ६ हजार ६४ : ०

हातकणंगले : ४ हजार ६०० : २ हजार ६७३ : १ कोटी ३३ लाख ६५ हजार : १ हजार ९२७ : २ हजार ५००

पन्हाळा : ३ हजार १४३ : १ हजार ५७२ : ७८ लाख ५७ हजार ५०० : १ हजार ५७१ : ०

कागल : २ हजार ५४१ : २ हजार ४२१ : ६० लाख ५२ हजार ५०० : १२० : ०

इचलकरंजी ग्रामीण : २ हजार ४६८ : २हजार ४६८ : १ कोटी २३ लाख ४० हजार : ० : ०

गडहिंग्लज : १ हजार ८७२ : ९५९ : ४७ लाख ९५ हजार : ९१३ : ०

शाहूवाडी : १ हजार ४९४ : १ हजार ४५९ : ३६ लाख ४७ हजार ५०० : ३५ : ८७ हजार ५००

चंदगड : ४११ : ४११ : १० लाख २७ हजार ५०० : ० : ०

गगनबावडा : ३३७ : ३०० : ७ लाख ५० हजार : ३७ : ०

भुदरगड : ३३६ : ३३६ : ८ लाख ४० हजार : ० : १ लाख ८० हजार

राधानगरी : २३० : २३० : ५ लाख ७५ हजार : ० : ०

आजरा : ८८ : ४४ : २ लाख २० हजार : ४४ : ०

एकूण : ६९ हजार ४७८ : ३५ हजार ३५८ : १६ कोटी, ३८ लाख, ९५ हजार : ३४ हजार १२० : १ कोटी ३ लाख १० हजार

-------------

Web Title: Just waiting for the half-flooded grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.