पीरवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; १९ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:58 AM2018-09-10T00:58:49+5:302018-09-10T00:58:52+5:30

Juvenile raid on Peerwadi raid; 19 people arrested | पीरवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; १९ जणांना अटक

पीरवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; १९ जणांना अटक

Next


कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावरील साई कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री करवीर पोलिसांनी छापा टाकून, खासगी सावकार सूरज साखरेसह १९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ११ दुचाकी, १ कार, २२ मोबाईल, गॅस सिलिंडर असा सुमारे १२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या संशयितांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका झाली.
अधिक माहिती अशी, पीरवाडीच्या माळावर साई कला- क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बंद खोलीमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू आहे, अशी माहिती खबऱ्याकडून करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व पथकाला घेऊन शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकला. अचानक पडलेल्या छाप्याने जुगार खेळणारे भांबावून गेले. पोलिसांनी चारीही बाजूंनी खोलीला वेढा घातला होता. तरीही त्यातून काहीजणांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
यावेळी पोलिसांच्या हाती १९ जण लागले. पोलिसांनी जाग्यावर पंचनामा करून ८७ हजार रोख,
१ लाख २१ हजार रुपये किमतीचे २२ मोबाईल, ११ दुचाकी व १ कार, असा १२ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल
जप्त केला. ताब्यात घेतलेल्यांना खोलीतच जमिनीवर बसवून त्यांचे नाव, पत्ता विचारून घेतले. माळरानावर वाहनांची गर्दी, जत्रा फुलल्यासारखी असायची.
अटक केलेल्यांची नावे अशी :
संशयित क्लब मालक सूरज हणमंत साखरे (वय ३०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), इस्माईल शौकत बागवान (वय ३५, रा. सुभाषनगर, कोल्हापूर), दादासो महिपती आळवेकर (२२, रा. कसबा बावडा, चौगले गल्ली), रोहित शंकर जगमळाणी (३०, रा. सर्किट हाऊससमोर, सरलष्कर भवन), सचिन चंद्रकांत सावंत (२६, रा. जलदर्शन कॉलनी, देवकर पाणंद) शेखर दिलीप गाडेकर (२८, रा. जयसिंगपूर), विनायक रामभाऊ केळकर (३३, रा. संभाजीनगर स्टॅन्ड), उमेश दिनकर उलपे (२२, रा. उलपे मळा, कसबा बावडा) जयदीप राजाराम अतिग्रे (२८, रा. पडवळवाडी, ता. करवीर), संभाजी हणमंत जाधव (४०, रा. साळोखे नगर), स्वप्निल तुकाराम पोवार (२२, रा. कळे, ता. पन्हाळा), सागर सुभाष पाटील (३२), अभिजित सुभाष पाटील (३०, दोघेही रा. मंगळवार पेठ), सरदार आनंदा पाटील (२८, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, श्रीकांत शामराव पाटील (२९, रा. कुई, ता. करवीर), अमित बाळासाहेब बुकशेठ (३५, रा. रुईकर कॉलनी, महाडिक माळ), प्रकाश बाबूराव पाटील (४०, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर), वसीम मेहमुद कुमंदन (२९, रा. न्यू शाहूपुरी), श्रीधर दत्तात्रय डावरे (३६, रा. सोनगे, ता. कागल).
आठवड्याला जत्रा फुलते
संशयित सूरज साखरे याने सांस्कृतिक क्लबच्या नावाने परवानगी घेतली आहे. काही दिवस हा क्लब चालविला. त्यानंतर क्लब बंद करून जुगार अड्डा सुरू केला. दर शनिवार-रविवार जत्रा फुलल्यासारखी लोकांची जुगार खेळण्यासाठी गर्दी होत असते. याठिकाणी सभासद नोंदणी करून घेतली जात होती. रात्री-अपरात्री हे जुगार खेळणारे मद्यपान करून असतात. या परिसरातील रहिवाशी महिला व युवतींना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. सराईत गुन्हेगारांची या ठिकाणी नेहमी ये-जा असायची. नागरिकांच्या पाचविला हा त्रास पुजलेला असायचा. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांतून कौतुक होत आहे.

Web Title: Juvenile raid on Peerwadi raid; 19 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.