शिवाजी विद्यापीठातील ज्योती जाधव यांचा जागतिक शास्त्रज्ञांमध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:20+5:302021-06-03T04:18:20+5:30
स्वयंभूवाडी येथील विजयमाला कृष्णकांत बाटे यांच्या कन्या असणाऱ्या प्रा. ज्योती जाधव यांनी यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात टॉप टू ...
स्वयंभूवाडी येथील विजयमाला कृष्णकांत बाटे यांच्या कन्या असणाऱ्या प्रा. ज्योती जाधव यांनी यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात टॉप टू पर्सेंट शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळविले होते. जागतिक मानांकनामध्ये सातत्याने असणाऱ्या त्या विद्यापीठातील एकमेव महिला प्राध्यापक आहेत. बायोटेक रिसर्च सोसायटीने सन २०११ मध्ये त्यांना यंग वुमेन सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित केले आहे. बायोरेमेडिएशन ॲन्ड न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसीझेस या विषयातील त्यांना दीर्घ अनुभव आहे. विद्यापीठातील वैद्यकीय माहिती व्यवस्थापन, पर्यावरण जैवतंत्रज्ञान या विभागांच्या प्रमुखपदीदेखील सध्या त्या कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत पीएचडीच्या ३० विद्यार्थ्यांना आणि चार पोस्ट डॉक्टोरल फेलोंना मार्गदर्शन केले आहे.
चौकट
सांडपाणी शुद्धिकरणावर काम करणार
पर्यावरण व्यवस्थापन आणि संरक्षण क्षेत्रात मी संशोधन केले आहे. विविध वनस्पती, सूक्ष्मजीवांचा वापर करून टेक्सटाईल इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाणी शुद्धिकरणाबद्दल संशोधन केले. आता बायोचारचा वापराद्वारे फार्मास्ट्युिकल उद्योगांतून निघणाऱ्या सांडपाणी शुद्धिकरणाबाबत संशोधन करणार असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले.
फोटो (०२०६२०२१-कोल-ज्योती जाधव (विद्यापीठ)