जोतिबाची कमळपुष्पातील पूजा
By admin | Published: September 26, 2014 09:16 PM2014-09-26T21:16:24+5:302014-09-26T23:30:35+5:30
त्याला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार
जोतिबा : येथील जोतिबा मंदिरात आज, शुक्रवारी नवरात्रोत्सवातील दुसऱ्या माळेला श्री जोतिबाची कमळपुष्पातील तीन पाकळ्यांमध्ये खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. यावेळी धुपारती, भजन, आदी कार्यक्रम झाले.
श्री जोतिबा नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे तीन वाजता महाघंटेने मंदिराचे दरवाजे उघडले. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला कमळपुष्पातील तीन पाकळ्यांमध्ये जोतिबा देवाची पूजा बांधण्यात आली. ही पूजा महादेव झुगर, विनोद मिटके, अंकुश दादर्णे, प्रवीण कापरे, प्रकाश सांगळे, बाबासाहेब लादे, आदिनाथ लादे, दगडू भंडारे, निवास शिंदे यांनी बांधली. नवरात्रीत नऊ दिवस कमळपुष्पातील पूजा बांधतात. त्याला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे. कमळभैरवाने श्री जोतिबाची याप्रकारे पूजा बांधल्याची कथा सांगितली जाते. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे धुपारती सोहळा निघाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. (वार्ताहर)