कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा प्रयत्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:59 AM2017-07-31T00:59:17+5:302017-07-31T00:59:17+5:30
कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’च्या कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून वरिष्ठ अधिकाºयांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच ‘काम बंद आंदोलन’ जाहीर केले.
‘झिरो पेंडन्सी’साठी गेले काही दिवस जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाºयांना रविवारची सुटीही दिली नाही. अशातच चार दिवसांपूर्वी या कामाच्या पाहणीसाठी पुण्याहून आलेले सहायक आयुक्त विलास जाधव यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका कर्मचाºयाला निलंबित केले, तर एकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.
जिल्'ातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत गेले महिनाभर केवळ हेच काम सुरू असल्याने कर्मचाºयांना सुटीच्या दिवशीही कामावर यावे लागत आहे. गुरव हे दोन दिवस तणावाखालीच होते. हे काम आपल्याला झेपत नसल्याचे ते सहकाºयांना सांगत होते. मात्र ‘आपण सर्वजण मिळून तुमचे काम करू,’ असे सांगून इतरांनी त्यांची समजूत काढली. रविवारी सकाळी गुरव हे घरातून साडेनऊ वाजता बाहेर पडले. तेथून माळ्याची शिरोली येथे सासुरवाडीला गेले. तेथून साडेदहा वाजता ते बाचणी येथील तुळशी नदीवर असणाºया बंधाºयाजवळ आले. तेथे त्यांनी मोटारसायकल लावली आणि ‘ग्रामोझोन’ या तणनाशकाचे प्राशन केले. ते पिऊन त्यांनी तुळशी नदीत उडी घेतली. तेथील शेतकºयांनी हा प्रकार पाहून त्यांना तातडीने नदीतून बाहेर काढून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. थोड्याच वेळात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विनाकारण कुणाचेही निलंबन होणार नाही
‘झिरो पेंडन्सी’मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले आहे. हे सर्व कर्मचाºयांचे योगदान आहे. मात्र ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने त्याचा ताण घेऊ नये. विनाकारण कुणालाही निलंबित करणे किंवा नोटीस देण्याचे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी दिली. -वृत्त/४