कबनूरमध्ये डॉ. आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांद्वारे साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:22 AM2021-04-15T04:22:50+5:302021-04-15T04:22:50+5:30
मणेरे हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक सुधाकर मणेरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी सुभाष केटकाळे, संजय देशपांडे, मुख्याध्यापिका टी. आर. ...
मणेरे हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक सुधाकर मणेरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी सुभाष केटकाळे, संजय देशपांडे, मुख्याध्यापिका टी. आर. मणेर, पी. बी. ऐनापुरे, प्राचार्य यु. यु. माने उपस्थित होते. मातंग समाज यांच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सुलोचना कट्टी व संजय कट्टी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी मुख्याध्यापक मारुती आवळे, प्रा. सुनील गवरे, कुंदन आवळे, तानाजी आवळे, ऐवन हेगडे, आदी उपस्थित होते. योगेश गवरे यांनी आभार मानले.
कबनूर काँग्रेस समितीच्या कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे व नगरसेवक शशांक बावचकर यांनी केले. यावेळी कबनूर शहर काँग्रेस अध्यक्ष अरुण गिते, माजी सरपंच उदय गीते, नारायण फरांडे, अल्ताफ मुजावर, रियाज चिकोडे, महेश कांबळे, शिवाजी चव्हाण, राजू मुल्ला, कुणाल भोसले, युवराज कांबळे, आदी उपस्थित होते.
चौकट :
रक्तदान शिबिर
महात्मा जोतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी ३५ युवकांनी रक्तदान केले.