शिक्षक बनले आता ‘कडकलक्ष्मी’
By admin | Published: January 4, 2017 01:15 AM2017-01-04T01:15:50+5:302017-01-04T01:15:50+5:30
अतिरिक्त शिक्षकांचा लढा : उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन
कोल्हापूर : अतिरिक्त शिक्षकांच्या सहाव्या वेतनाचा आदेश व्हावा. समायोजनाबाबत शिक्षण विभागाने ठोस कार्यवाही करावी, या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांनी मंगळवारी प्रतीकात्मक कडकलक्ष्मी आंदोलन केले.
खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. नवव्या दिवशी या ठिकाणी प्रतीकात्मक कडकलक्ष्मी आंदोलन केले. त्यात अतिरिक्त शिक्षक एस. के. पाटील यांनी प्रतीकात्मक कडकलक्ष्मीची वेशभूषा करून सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते विज्ञान सल्लागार अशोक रणदिवे यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मागण्या तसेच शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. आंदोलनात व्ही. जी. पाटील, संतोष आयरे, डी. एस. कांबळे, व्ही. एस. पाटील, पी. डी. शिंदे, पी. के. चव्हाण, एस. आर. थोरात, ए. एम. परीट आदींसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता अंबाबाई देवीच्या मंदिरात दंडवत घालणार आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात मंगळवारी अतिरिक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक कडकलक्ष्मी आंदोलन केले.