Lok Sabha Election 2019 ‘कागल’ने गमावलेली खासदारकी खेचून आणूया: संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:02 AM2019-04-19T00:02:30+5:302019-04-19T00:02:45+5:30

कागल : गेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमसिंह राजे गट आमच्या विरोधात होता. तेव्हा तालुक्यातून मला दहा हजार मतांचे मताधिक्य होते. ...

'Kagal' pulls down the lost MP: Sanjay Mandalik | Lok Sabha Election 2019 ‘कागल’ने गमावलेली खासदारकी खेचून आणूया: संजय मंडलिक

Lok Sabha Election 2019 ‘कागल’ने गमावलेली खासदारकी खेचून आणूया: संजय मंडलिक

Next

कागल : गेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमसिंह राजे गट आमच्या विरोधात होता. तेव्हा तालुक्यातून मला दहा हजार मतांचे मताधिक्य होते. आज वातावरण वेगळे आहे. राजे गट आमच्यासोबत आहे. त्यामुळे यावेळी कागल तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल. कागलने गमावलेली खासदारकी परत खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
कागल शहरात मंगळवारी बसस्थानक ते गैबी चौक अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार संजय घाटगे, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्धची लढाई आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा मार्ग उद्धवजी ठाकरे यांनी देशाला दाखविला आहे. पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल तालुक्यात यावेळी भाजप-सेनेची हवा आहे.
प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचे निर्णायक मतदान कागल तालुक्यातील जनता करणार आहे. यावेळी महेश जाधव, उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली. स्वागत आभार राजेंद्र जाधव यांनी केले. यावेळी हर्षल सुर्वे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, अतुल जोशी, बंडोपंत चौगुले, शिवाजीराव इंगळे, ईगल प्रभावळकर, बॉबी माने, शहराध्यक्ष अरुण सोनुले, सुलोचना साळोखे, विवेक कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

पवारांच्या सभेपेक्षा
दुप्पट गर्दीची सभा घेऊ...
आपल्या भाषणात समरजितसिंह घाटगे म्हणाले की, गेल्या वेळी कागल शहरातून संजय मंडलिक यांना मते कमी मिळाली होती. ती भरपाई यावेळी करूच; पण जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य कागलमधूनच असेल. येत्या १९ तारखेला गैबी चौकात प्रचारसभा आहे. गैबी चौकात काही दिवसांपूर्वी शरद पवारांची सभा झाली. त्या सभेच्या दुप्पट गर्दी आमच्या सभेत असेल.

Web Title: 'Kagal' pulls down the lost MP: Sanjay Mandalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.