Kagal Satara Highway : कागल-सातारा महामार्गावरील टोलची मुदत संपली, तरीही वसुली‌ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:44 PM2022-05-02T16:44:08+5:302022-05-02T16:44:44+5:30

सतीश पाटील शिरोली : कागल-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची २० वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. पण पुढील ५३ ...

Kagal Satara Highway: Toll on Kagal-Satara Highway expired, recovery continues | Kagal Satara Highway : कागल-सातारा महामार्गावरील टोलची मुदत संपली, तरीही वसुली‌ सुरूच

Kagal Satara Highway : कागल-सातारा महामार्गावरील टोलची मुदत संपली, तरीही वसुली‌ सुरूच

googlenewsNext

सतीश पाटील

शिरोली : कागल-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची २० वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. पण पुढील ५३ दिवस रस्ते विकास महामंडळाकडे पथकर वसुली‌ आहे तशीच सुरू राहणार आहे.

सन २००२ मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कागल‌-सातारा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या महामार्गाची पथकर वसुलीची मुदत २० वर्षांची होती. कागल-सातारा चौपदरीकरणाची मे महिन्यात मुदत संपली आहे. पण गेल्या वीस वर्षांत नोटबंदी, कोरोना लॉकडाऊन काळात ५३ दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाला ५३ दिवस पथकर वसुलीसाठी मुदत वाढवून मिळाली आहे.२५ जून २०२२ पर्यंत पथकर वसुली रस्ते विकास महामंडळ करणार आहे.२५ जून नंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे.

कागल सातारा सहा पदरीकरणाची निविदा निघेल अशी अपेक्षा होती. पण तांत्रिक त्रुटी मुळे निवीदाच निघालेल्या नाहीत त्यामुळे सहापदरीकरण सुरू होवू शकलेले नाही. आणि चौपदरीकरणाची मुदत संपली आहे. त्यामुळे वाहनधारक  पथकर का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

मार्गाच्या सहापदरीकरणाची निविदा मे महिन्यापर्यंत निघाली नाहीतर या मार्गावरील पथकरात सवलत मिळेल अशी अपेक्षित होते. पण तसे न होता ५३ दिवस पथकर वसुलीची मुदत वाढवून दिली आहे.

कागल-सातारा महामार्गाच्या पथकर वसुलीसाठी ५३ दिवस मुदत वाढ रस्ते विकास महामंडळाला मिळाली आहे.यानंतर हा महामार्ग  रस्ते विकास महामंडळाकडून  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होईल. -वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग -प्रकल्प व्यवस्थापक

Web Title: Kagal Satara Highway: Toll on Kagal-Satara Highway expired, recovery continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.