कागलचा खासगी लसीकरण उपक्रम पथदर्शक ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:23+5:302021-07-27T04:26:23+5:30

कागल : कागल शहरासह कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदार संघ हा शंभर टक्के लसीकरण झालेला पहिला मतदारसंघ असेल. ...

Kagal's private vaccination initiative will be a guide | कागलचा खासगी लसीकरण उपक्रम पथदर्शक ठरेल

कागलचा खासगी लसीकरण उपक्रम पथदर्शक ठरेल

googlenewsNext

कागल

: कागल शहरासह कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदार संघ हा शंभर टक्के लसीकरण झालेला पहिला मतदारसंघ असेल. दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्या योगदानातून सुरू असलेला कागलचा मोफत लसीकरणाचा उपक्रम महाराष्ट्रासह सबंध देशाला पथदर्शी ठरेल, असे उद‌्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

कागल नगरपरिषद व दि फेडरल बँकेच्या संयुक्त योगदानातून शहरातील नागरिकांना मोफत लसीकरणाच्या अभियानाचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी दि फेडरल बँकेचे असिस्टंट मॅनेजर नरहरी कुलकर्णी होते. या उपक्रमांतर्गत शहरातील अठरा वर्षावरील तीन हजार नागरिकांना खासगी दवाखान्याच्या माध्यमातून मोफत लसीकरण केले जाणार आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ७० टक्के लसीकरण झाल्याशिवाय देश कोरोनामुक्त होणार नाही. लस ही जरी संजीवनी नसली तरी लसीकरणानंतर धोका कमी आहे. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, नरहरी कुलकर्णी प्रकाशराव गाडेकर यांचीही मनोगते झाली.

यावेळी गडहिंग्लजच्या स्वराज्य हॉस्पिटलचे डॉ. अजित पाटोळे, जिल्हा बँकेचे संचालक असिफ फरास, चंद्रकांत गवळी, पी. बी. घाटगे, डॉ. अमर पाटील, प्रकाश नाळे, सुनील माळी, संजय चितारी, आनंदा पसारे आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत नगरसेवक प्रवीण काळबर सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी आभार सौरभ पाटील यांनी मानले.

असे आहे हे लसीकरण अभियान.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल,गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के लसीकरण होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या, सामाजिक संस्था याचे योगदान घेतले जाणार आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनीही वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमात योगदान द्यावयाचे आहे.

फोटो ओळी.......

कागल येथे नागरिकांना मोफत खासगी कोविशिल्ड लसीकरण अभियानाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नरहरी कुलकर्णी, भैय्या माने, असिफ फरास, डॉ. अजित पाटोळे, मोहन कुंभार, प्रकाशराव गाडेकर व इतर प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Kagal's private vaccination initiative will be a guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.