‘राधानगरी’त काजवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:38 PM2018-04-26T23:38:45+5:302018-04-26T23:38:45+5:30

Kajwa Festival in Radhanagari | ‘राधानगरी’त काजवा महोत्सव

‘राधानगरी’त काजवा महोत्सव

googlenewsNext


राधानगरी : निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या राधानगरी अभयारण्यात निसर्गाचा आणखी एक लखलखता आविष्कार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येथील राधानगरी नेचर क्लबच्यावतीने फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात २६ मे रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानमेव्याचा आस्वादही घेता येणार आहे. क्लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, शशांक लिंग्रस, अनिल चव्हाण यांनीही माहिती दिली.
विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, दुर्मीळ वनस्पती यांची रेलचेल असलेल्या या अभयारण्याचे निसर्गप्रेमी, अभ्यासक, पर्यटक व सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण असते. जून ते आॅक्टोबर हा पावसाचा काळ वगळता अन्य काळात येथे हजारो पर्यटक भेट देतात. प्रचंड पाऊस, खळाळणारे पाणी, धुके, धरणांतील विस्तृत पाणीसाठा, फेसाळणारे धबधबे यातून निसर्गाचे खरे रूप या परिसरात नजरेस पडते. पावसाळ्यानंतर सर्वत्र हिरवाईने नटलेल्या निसर्गाचे मनमोहक दृश्य खिळवून ठेवते. उन्हाळ्यात होणाऱ्या पानगळीनंतर एका बाजूला रखरखता उन्हाळा, तर दुसºया बाजूला कोवळ्या पालवीचे अंकुर पाहणाºयांच्या मनाला गारवा देऊन जातात.
या काळातच जंगल रात्रीच्या वेळी उजळून निघते. चमकणाºया काजव्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर फिरत असतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या दृश्याचा अनोखा अनुभव घेण्याची संधी या महोत्सवात निसर्गप्रेमींना मिळणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाला सुरुवात होईल. काळम्मावाडी धरण मार्गावरील फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात मुख्य कार्यक्रम होईल. शिवाय आसनगाव धनगरवाडा परिसरातील जंगलातही भ्रमंती करून याचा अनुभव घेता येणार आहे.
ग्रामस्थांच्या सहभागातून आयोजन

राधानगरी वन्यजीव विभाग, राजापूर व फराळे येथील स्थानिक परिस्थिकीय समिती, ग्रामस्थांच्या सहभागातून राधानगरी नेचर क्लबने याचे आयोजन केले आहे. यामध्ये अल्पोपाहार, एक वेळचे शाकाहारी जेवण, आंबा, काजू, करवंदे, फणस यासारख्या रानमेव्यांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला बाटलीबंद शुद्ध मध भेट देण्यात येणार आहे.

 

 

 

 

Web Title: Kajwa Festival in Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.