कळंबा तलावाचे साडे सात कोटींचे सुशोभीकरण ‘अंधारात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 08:56 PM2018-10-08T20:56:59+5:302018-10-08T20:59:51+5:30
१३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कळंबा तलावाचे सौंदर्य साडे सात कोटींच्या सुशोभीकरनाच्या कामाने खुलले आहे. परंतु सुशोभीकरनाचे काम करणाºया निविदा धारक कंपनीने तलाव परिसरात पथदिवे न लावल्याने सारे सुशोभीकरणच रात्रीच्या अंधारात गडप झाले आहे.
- अमर पाटील-
कळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कळंबा तलावाचे सौंदर्य साडे सात कोटींच्या सुशोभीकरनाच्या कामाने खुलले आहे. परंतु सुशोभीकरनाचे काम करणाºया निविदा धारक कंपनीने तलाव परिसरात पथदिवे न लावल्याने सारे सुशोभीकरणच रात्रीच्या अंधारात गडप झाले आहे. तलावाची मालकी असणारे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नी दुर्लक्ष झाले त्यामुळे निविदा धारक कंपनीने पथदिवे लावलेच नाहीत विरंगुळा मनशांती व व्यायामासाठी येणाºया नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप होत असून सुशोभीकरण केलेल्या परिसरात रात्री दारूच्या पार्ट्यांचा महापूर उसळला असून प्रेमीयुगलांनी उच्छाद मांडला आहे साडे सात कोटींचे सुशोभीकरण रात्र होताच अंधारात गडप होते व रात्रीचे खेळ सुरू होतात
एकीकडे पिण्याच्या पाण्याच्या तलावाचा वापर आता आत्महत्या केंद्र म्हणून वाढत आहे तलावातील पाण्यासह ,सुशोभीकरण परिसराची सुरक्षा हा संवेदनशील विषय असून निव्वळ पथदिवे नसल्याने आज सारेच अंधारात चाचपटत आहेत लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र याप्रश्नी फारसे गंभीर नाही पालिका जैवविविधता समिती पर्यावरण तज्ज्ञांनी याप्रश्नी आवाज उठवून ही त्यांची हाक प्रशासनास आजअखेर ऐकू गेली नाही वैशिष्ट्य म्हणजे तलावावर एकही कायम स्वरूपी कर्मचारी पालिकेने नियुक्त केला नाही शाहू कालीन ठेव्याविषयी प्रशासनास काहीही सोयरेसुतक नाही तलावाच्या प्रवेशद्वारा पासुन सांडव्या पर्यंत पूर्वी पथदिवे होते. लोखंडी संरक्षक कठडा मोडलेल्या धोकादायक मनो?्या लगतही पथदिवे होते सुशोभीकरण करणा?्या निविदाधारक कंपनीने हे पथदिवे उध्वस्त केले पण नवीन पथदिवे सुद्धा लावले नाहीत.
आज तलाव परिसरात सुशोभीकरण कामा अंतर्गत अडीच किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक, शंभर मीटर व्यासाचे प्रवेशद्वार जनावरे धुण्याचा हौद दहा लाखांची ओपन जिम आदी सुविधा उपलब्ध असल्याने महिला युवती व जेष्ठ नागरिकांची संध्याकाळी मोठी गर्दी असते संध्याकाळ नंतर पथदिवे नसल्याने हा परिसर फिरायला येणा?्या नागरिकांसाठी सुरक्षित राहात नाही तलावा समोर करवीर पोलिसस्टेशनची पोलिसचौकी उभा असूनही दारूच्या व मटणाच्या जेवणावळी प्रेमीयुगलांचे चाळे व टवाळखोरांचा उच्छाद यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत तलाव परिसरात सुरक्षिततेसाठी नियोजित सिसिटी कॅमेरेही बसवले गेले नसल्याने सुरक्षिततेचा तिसरा डोळाही गायब आहे
आज निधीअभावी सुशोभीकरण रखडले आहे तर दोन वर्षांपूर्वी निविदा धारक कंपनी गाशा गुंडाळून निघून गेली आहे किमान पालिका प्रशासनाने तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणा?्या कळंबा पाचगाव ग्रामपंचायत प्रशासनाने सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन पथदिवे बसवून नागरिकांची गैरसोय दूर करावी ही मागणी जोर धरत आहे.
सापांचा सुळसुळाट
तलाव परिसर गर्द झाडीने बहरला असून निविदा धारक कंपनीने परिसरात चार हजार वृक्षांचे उध्यान उभा केले आहे रात्री विषारी व बिनविषारी सापांचा सुळसुळाट पसरला असून पथदिवे नसल्याने सारे धोकादायक बनले आहे
फोटो - संग्रहीत कळंबा तलावाचा फोटो वापरावा