कळंब्याचे गोपालकृष्ण कामत ‘अल्टो’चे मानकरी

By admin | Published: August 9, 2015 01:46 AM2015-08-09T01:46:46+5:302015-08-09T01:46:46+5:30

‘लोकमत’च्या वाचाल तर जिंकाल स्पर्धेचा लकी ड्रॉ : पाटील, माने, संकपाळ सोन्याच्या नेकलेसचे विजेते

Kalambi Gopalakrishna Kamat alto's honorary | कळंब्याचे गोपालकृष्ण कामत ‘अल्टो’चे मानकरी

कळंब्याचे गोपालकृष्ण कामत ‘अल्टो’चे मानकरी

Next

कोल्हापूर : ‘लोकमत’ प्रस्तुत लोकराजा राजर्षी शाहू यांच्या जीवनावर आधारित चित्रकथा स्पर्धेत कळंबा (ता. करवीर) येथील गोपालकृष्ण भास्कर कामत हे ‘अल्टो’ कार या बंपर बक्षिसाचे मानकरी ठरले. शनिवारी तुडुंब गर्दीने भरलेल्या वाचकांच्या उपस्थितीत हा ड्रॉ काढण्यात आला. न्यू महाद्वार रोडवरील पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे हा शानदार कार्यक्रम झाला.
‘लोकमत’ प्रस्तुत व आर. बी. मालू ग्रुपचे ‘ओम नमो नमकिन’ आयोजित ‘लोकराजा राजर्षी शाहू’ या राजर्षी शाहू महाराज यांच्या चित्रकथेवर आधारित ‘वाचाल तर जिंकाल’ ही स्पर्धा २८ जानेवारी ते २७ एप्रिल २०१५ या दरम्यान घेण्यात आली होती. या योजनेत एकूण नव्वद कुपने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांत शाहू महाराजांच्या चित्रकथेवर प्रश्न विचारण्यात येऊन कुपनमध्ये प्रश्नाचे अचूक उत्तर लिहून प्रवेशिकेवर ते कुपन चिकटवायचे होते. यासाठी मोठ्या संख्येने प्रवेशिका आल्या होत्या.
स्पर्धेचा लकी ड्रॉ महापौर वैशाली डकरे यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील, लेखा व्यवस्थापक अनिल पेटकर, ‘माई हुंडाई’चे विक्री अधिकारी दीपक कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रायोजक ट्रेंझ फर्निचरचे भागीदार सचिन वरपे, भरत पाटील व माई हुंदाई होते.
यामध्ये ‘लोकमत’ बंपर ड्रॉचे अल्टो कारचे बक्षीस गोपालकृष्ण भास्कर कामत (श्रीकृष्ण कॉलनी, भोगम शाळेजवळ, कळंबा, ता. करवीर) यांना मिळाले. उर्वरित उत्तेजनार्थसह पाच बक्षिसांची सोडत यावेळी काढण्यात आली. दरम्यान, वसंत अर्दाळकर यांनी हिंदी-मराठी गीतांचा सदाबहार ‘पल पल दिल के पास’द्वारे या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ‘लोकमत’वर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या तुडुंब गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.
महापौर डकरे म्हणाल्या, ‘लोकमत’ने शाहूंच्या जीवनकार्यावर आधारित अशी स्पर्धा घेऊन आजच्या पिढीला त्यांचे विचार देण्याचे काम केले आहे. हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’ने वाचकांशी वेगळे नाते निर्माण केले आहे.
संपादक वसंत भोसले म्हणाले, ज्यांना शाहूंचे ग्रंथवाचन करणे शक्य नाही, तसेच त्यांचे चरित्र व कथा वाचणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी चित्रकथेच्या माध्यमातून शाहूंचे चरित्र मांडण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. याचा आजच्या पिढीला निश्चित उपयोग होईल.
सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील यांनी या स्पर्धेची माहिती देताना संपूर्ण जिल्ह्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. यासाठी मोठ्या संख्येने प्रवेशिका आल्याचे सांगितले. राजेंद्र कोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
‘लोकमत’मुळे नशीब उघडले...
बंपर ड्रॉचे अल्टो कारचे बक्षीस मिळालेले गोपालकृष्ण कामत यांचा आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. ते ‘लोकमत’चे नियमित वाचक आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देताना मी ‘लोकमत’चा नियमित वाचक असून, प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असतो. या स्पर्धेत बंपर ड्रॉची अल्टो कार बक्षीस मिळाल्याने आपले नशीब उघडले आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या या चांगल्या उपक्रमातून मिळालेले बक्षीस हे आपल्यासाठी भाग्यदायी आहे. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आपल्याला काहीतरी बक्षीस
लागेल इतकीच अपेक्षा धरली होती, परंतु इतके मोठे बक्षीस मिळेल हे स्वप्नातही पाहिले नव्हते. ‘लोकमत’मुळे हे शक्य झाले आहे, असे सांगितले.
विजेत्यांची नावे अशी
प्रथम क्रमांक : (एक तोळ्याचे ३ सोन्याचे नेकलेस बक्षीस)- विजेत्यांची नावे : युवराज राजेंद्र पाटील (लघुवेतन कर्मचारी सोसायटी, उजळाईवाडी, कोल्हापूर), स्वप्नाली रामचंद्र माने (जुने पारगाव, ता. हातकणंगले), साहिल सयाजी संकपाळ (संकपाळवाडी-कसबा वाळवे, ता. राधानगरी).
द्वितीय क्रमांक : (५ एलईडी/ एलसीडी टीव्ही बक्षीस)- विजेत्यांची नावे : ललिता प्रवीण राठोड (प्लॉट क्रं.११, उदयसिंहनगर, न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर), सिध्दी सुनील पाटील (हेरवाड, ता. शिरोळ), वृंदा मदन बागल (११८५/१३ क, राजारामपुरी ४ थी गल्ली, कोल्हापूर), चांदणी अनंत पोवार (१०४२ एफ/६, प्लॉट नं.१३, विशालनगर, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर), स्वप्निल मधुकर मंडल (घ.नं. ५३८, न्यू मोरे-माने नगर, रिंगरोड, कोल्हापूर).
तृतीय क्रमांक : (५ गॅस शेगडी बक्षीस)- विजेत्यांची नावे : स्वाती सुरेश वर्णे (२३९ क, प्लॉट नं. एल-१०, महिपतराव बोंद्रे नगर, राधानगरी रोड, कोल्हापूर), बापू गोविंदा जाधव (बेलवळे खुर्द, ता. कागल), पुष्पाबाई विजयकुमार रुणवाल (७वी गल्ली, माळभाग, जयसिंगपूर), मल्लाप्पा शिवलिंग मगदूम (हलकर्णी, ता. गडहिंग्लज), सुवर्णा जयपाल रोटे (२०५४ सी, वॉर्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर).
चतुर्थ क्रमांक : (१० स्मार्टफोन बक्षीस)-विजेत्यांची नावे : रोहित सूर्यकांत पाडळकर (७२१ डी वॉर्ड, ऋणमुक्तेश्वर गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), रघुनाथ हरी डवरी (चिखली, ता. कागल), स्वाती श्रीकांत भोसले (डी वॉर्ड, जामदार क्लब, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), पृथ्वीराज भीमराव जाधव (रेपेगल्ली, वळीवडे, ता. करवीर), दीपाली प्रशांत गुजर (५९७/१. प्लॉट नं. ९३, बी वॉर्ड, रामानंदनगर, कोल्हापूर), अभिषेक संतोष माने (१७८७, डी वॉर्ड, नागराज गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), प्रमोद जगन्नाथ उरणकर (२०५५ डी वॉर्ड, धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), कमल शिवाजी साळवी (१५६२, ई वॉर्ड, राजारामपुरी ३ री गल्ली, कोल्हापूर), मनीषा मधुकर दिंडे (६८ ई वॉर्ड, एमएसईबी आॅफिससमोर यादवनगर, कोल्हापूर) सृष्टी शांतीनाथ डुणुंग (अब्दुललाट, ता. शिरोळ) (प्रतिनिधी)

Web Title: Kalambi Gopalakrishna Kamat alto's honorary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.